Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • चाकणकर-खरात 3 दिवस हॉटेलमध्ये, गुवाहाटीतील ‘त्या’ फोटोंनी खळबळ
Top News

चाकणकर-खरात 3 दिवस हॉटेलमध्ये, गुवाहाटीतील ‘त्या’ फोटोंनी खळबळ

Guwahati hotel photos controversy 

Guwahati hotel photos controversy  : माझा खरातशी काहीही संबंध नाही. फक्त अध्यात्मिक संबंध होत्या असं सांगणाऱ्या चाकणकरांबद्दल आता एक वादळी बातमी समोर आलीय. कारण चाकणकर आणि खरात हे सोबत गुवाहाटीला एका हॉटेलमध्ये तीन दिवस होते, अशी माहितीने खळबळ माजलीय. एवढंच काय तर या हॉटेल ट्रिपचे फोटोही समोर आलेत. ज्यात चाकणकर या खरातचा हात हात घेऊन उभ्या असल्याचे दिसत आहे. चाकणकर आणि खरात एका हॉटेलमध्ये एकमेकांच्या हातात हात घालणाऱ्या फोटोंमुळे वादळ निर्माण झालं आहे.

महाराष्ट्र राजकारणातील एक अत्यंत वादळी, खळबळजनक प्रकरणानं सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. दादांच्या राष्ट्रवादीच्या आघाडीच्या नेत्या, आक्रमक वक्त्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नाव एका स्वयंघोषित भोंदू बाबाशी जोडले गेल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. पण हा वाद केवळ राजकीय आरोपांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर या प्रकरणाला आता गुन्हेगारी, लैंगिक शोषण, आर्थिक गैरव्यवहार आणि तांत्रिक अघोरी पूजाअर्चा असे अनेक धक्कादायक झालर आहे.

हेही वाचा – मोठा भूकंप! दादांची राष्ट्रवादी फुटणार? आमदारांना घेऊन तटकरे, पटेल भाजप जाणार…

पुराव्यांसह केलेल्या एका दाव्याने या प्रकरणाला तोंड

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जाहीर सभेत पुराव्यांसह केलेल्या एका दाव्याने या प्रकरणाला तोंड फुटले. रुपाली चाकणकर आणि महिलांचे लैंगिक शोषण करणारा भोंदू बाबा अशोक खरात हे दोघे आसाममधील गुवाहाटी येथील एका आलिशान हॉटेलमध्ये सलग तीन दिवस एकत्र वास्तव्यास होते, हा तो दावा होता.

‘हॉटेल रॅडिसन ब्लू’ मध्ये या तिघांसाठी बुकिंग

या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे समजून घेण्यासाठी आपल्याला २०२१ मधील घडामोडींचा वेध घ्यावा लागेल. ऑगस्ट २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात, म्हणजेच २८ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२१ या तीन दिवसांच्या कालावधीत रुपाली चाकणकर, त्यांची सख्खी भगिनी प्रतिभा चाकणकर आणि स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू अशोक खरात यांनी आसामची राजधानी गुवाहाटीचा दौरा केला होता. गुवाहाटी येथील अत्यंत विस्तीर्ण आणि आलिशान समजल्या जाणाऱ्या ‘हॉटेल रॅडिसन ब्लू’ मध्ये या तिघांसाठी बुकिंग करण्यात आलं होतं. सरकारी आणि हॉटेलच्या अंतर्गत कागदपत्रांनुसार, या तिघांचेही वास्तव्य एकाच कालावधीत आणि एकाच हॉटेलमध्ये होते.

एकमेकांच्या हातात हात घेतलेले फोटो व्हायरल…

गुवाहाटी हे शहर देशातील तंत्र-मंत्र, अघोरी शक्ती आणि शक्तीपीठांचे केंद्र मानल्या जाणाऱ्या प्रसिद्ध ‘कामाख्या देवी’ मंदिरासाठी ओळखले जाते. या तीन दिवसांच्या वास्तव्यादरम्यान रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांनी कामाख्या देवीच्या मंदिरात जाऊन विशेष पूजा केली असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. राजकारणात मोठे पद मिळवण्यासाठी, विरोधकांवर मात करण्यासाठी किंवा अंतर्गत राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी या भोंदू बाबाच्या सांगण्यावरून ही पूजा करण्यात आली होती का? अशी शंका आता घेतली जात आहे. एकमेकांच्या हातात हात घेतलेले फोटो व्हायरल होता आहेत. मात्र, बाकी हॉटेलात तीन दिवसांत काय काय घडलं असेल? याचा अंदाज न लावलेलाच बरा.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts