• Home
  • राजकारण
  • मोठा भूकंप! दादांची राष्ट्रवादी फुटणार? आमदारांना घेऊन तटकरे, पटेल भाजप जाणार…
Top News

मोठा भूकंप! दादांची राष्ट्रवादी फुटणार? आमदारांना घेऊन तटकरे, पटेल भाजप जाणार…

NCP split Maharashtra politics

NCP split Maharashtra politics : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणार बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मोठा दावा केला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील २२ आमदार (NCP 22 MLA) घेऊन सुनिल तटकरे (Sunil Tatkare) आणि प्रफुल पटेल हे आगामी काळात भाजपमधून लढण्याच्या तयारीत असल्याच्या त्यांच्या विधाने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, रोहित पवारांना विलिनीकरणावर विचारले असता, ते म्हणाले भाजपसोबत असल्यांसोबत आम्ही जाणार नाही. भाजप (BJP) सोडून काही जण आमच्याकडे आले तर त्यांना स्विकारु. सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यावर केलेल्या कारवाईचे आम्ही स्वागत करतोय.

हेही वाचा – तटकरे पवारांना का भेटले? पार्थ, वहिनींशी बिनसले? का नवा राजकीय डाव?

नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची यादीवरून गोंधळ

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटातील राजकीय हालचाली पाहाता या दाव्याला बळ मिळाले आहे. कारण पक्षाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी जाहीर झाल्यानंतर पक्षात राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे. भारतीय निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि दिलीप पाटील यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांची नावे वगळल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुढील काळात काय नेमकं काय घडतंय? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र, रोहित पवार यांच्या राष्ट्रवादी फुटीच्या दाव्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

काहीतरी गंभीर शिजत असल्याचे स्पष्ट संकेत

गुवाहाटीला जाताना सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्यासाठी आरक्षित असलेल्या विशेष विमानाने प्रवास केला. मात्र, परतीच्या प्रवासात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या विमानाने प्रवास न करता, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष विमानाचा आसरा घेतला. एकाच पक्षातील दोन अत्यंत ज्येष्ठ नेत्यांनी जाताना एका नेत्याच्या विमानाने जाणे आणि परताना मुख्यमंत्र्यांच्या विमानाने येणे, यावरून पक्षात काहीतरी गंभीर शिजत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत होते.

काल रात्री अचानक शरद पवार यांची भेट

त्यानंतर सुनिल तटकरे यांनी काल रात्री अचानक शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट पवारांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर झाली. जवळपास दहा ते बारा मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली. या भेटीची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर वेगवेगळे तर्क काढले जात आहेत. राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर झाल्यानंतर तटकरे नाराज असल्याचं बोललं जात होतं. या भेटी मागे ही हेच कारण आहे का? याची ही चर्चा सुरू असताना आता रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. त्यामुळे दांदाची राष्ट्रवादी फुटीच्या उंबरट्यावर असल्याचं बोललं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts