• Home
  • क्रीडा
  • IPL मध्ये Virat Kohli चा कहर! नाबाद शतकासह RCB चा KKR वर दणदणीत विजय
Top News

IPL मध्ये Virat Kohli चा कहर! नाबाद शतकासह RCB चा KKR वर दणदणीत विजय

IPL 2026  RCB VS KKR

IPL 2026  RCB VS KKR : इंडियन प्रीमियर लीग 2026 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात काळ रात्री रोमहर्षक सामना झाला. सामन्यात विराट कोहलीने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. विशेष म्हणजे, या सामन्यापूर्वी तो सलग 2 सामन्यांमध्ये शून्यावर बाद झाला होता.

RCB विजय

विराट कोहलीने शानदार शतक झळकावत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला एका महत्त्वपूर्ण सामन्यात विजय मिळवून दिला. या शतकासह कोहलीने इतिहास रचला असून, तो टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे.रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने प्रथम फलंदाजी करत 192 धावा केल्या होत्या.लक्ष्याचा पाठलाग करताना जेकब बेथल 15 धावांवर बाद झाला. विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी केली. पडिक्कल 39 धावांवर बाद झाला, मात्र कोहलीचा जलवा कायम राहिला. त्यांनी IPL मधील आपले 9वे शतक पूर्ण केले.

टी20 मध्ये सर्वाधिक शतकं करणारा भारतीय फलंदाज
विराट कोहली आता टी20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतकं करणारा फलंदाज बनला आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एक शतक आहे, जे 2022 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध आले होते. याशिवाय तो IPL मध्ये 9 शतकं झळकावून आहे. टी20 मध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या भारतीयांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर अभिषेक शर्मा आहे, ज्याच्या नावावर 9 शतकं आहेत.

विराट कोहलीने रचला इतिहास
37 वर्षांच्या विराट कोहलीने आणखी एक मोठा विक्रम केला आहे. तो टी20 क्रिकेटमध्ये 14000 धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. तसेच जागतिक स्तरावर तो टी20 फॉर्मेटमध्ये 14000 धावा करणारा सहावा खेळाडू आहे. त्याच्याआधी ख्रिस गेल, कायरन पोलार्ड, अॅलेक्स हेल्स, डेविड वॉर्नर आणि जोस बटलर यांनी हा टप्पा गाठला आहे.

“एक दिवस हे सर्व संपेल”
त्याने पुढे म्हटले, “मी मैदानावर माझे सर्वस्व झोकून देतो, कारण एक ना एक दिवस हे सर्व संपणार आहे.” याचा अर्थ त्याने सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीचा संकेत दिला होता. सध्या कोहलीने टी20 आंतरराष्ट्रीय आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts