• Home
  • बिजनेस
  • बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय; एफडी व्याजदर वाढ, आजपासून नवीन दर लागू
बिजनेस

बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय; एफडी व्याजदर वाढ, आजपासून नवीन दर लागू

Bank Of India

Bank of India FD Rates: गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. आता बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी फिक्स्ड डिपॉझिट (FD) व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. १८ मे २०२६ पासून हे नवीन दर लागू झाले असून, एफडी गुंतवणूकदारांना आता अधिक परतावा मिळण्याची शक्यता आहे.

बँक ऑफ इंडिया (bank of india) ने आपल्या ग्राहकांसाठी फिक्स्ड डिपॉझिट (FD) व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी २०२५ पासून रेपो रेटमध्ये १२५ बेसिस पॉइंट्सची कपात झाल्यानंतर अनेक बँकांनी एफडी दर कमी केले होते. मात्र, बँक ऑफ इंडियाने याउलट भूमिका घेत काही कालावधीच्या एफडी योजनांवरील व्याजदर वाढवले आहेत.

हेही वाचा: कोल्हापूरकरांचा नाद वेगळाच! लग्नात जावयाला भेट दिली चांदीची चप्पल, किंमत ऐकून थक्क व्हाल

कधी लागू होणार?

ही सुधारित व्याजदर संरचना १८ मे २०२६ पासून लागू करण्यात आली असून ३ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या ठेवींवर ती लागू असेल.

नवीन एफडी व्याजदर (Bank of India)

1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी
सामान्य ग्राहक: 6.50%
ज्येष्ठ नागरिक: 7.00%
अतिज्येष्ठ नागरिक: 7.15%

2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा कमी
सामान्य ग्राहक: 6.60%
ज्येष्ठ नागरिक: 7.10%
अतिज्येष्ठ नागरिक: 7.25%

3 वर्षांची मुदत
सामान्य ग्राहक: 6.70%
ज्येष्ठ नागरिक: 7.45%
अतिज्येष्ठ नागरिक: 7.60%

या बदलामुळे मध्यम आणि दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना अधिक परतावा मिळण्याची शक्यता आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts