• Home
  • लाईफस्टाईल
  • कोल्हापूरकरांचा नाद वेगळाच! लग्नात जावयाला भेट दिली चांदीची चप्पल, किंमत ऐकून थक्क व्हाल
महाराष्ट्र

कोल्हापूरकरांचा नाद वेगळाच! लग्नात जावयाला भेट दिली चांदीची चप्पल, किंमत ऐकून थक्क व्हाल

silver chappal kolhapur

Kolhapur: सध्या एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोने-चांदी खरेदी टाळण्याचे आवाहन केले आहे, तर दुसरीकडे कोल्हापुरात लग्नसोहळ्यात जावयाला तब्बल दीड किलो वजनाची चांदीची चप्पल भेट देण्यात आली आहे. चला तर जाणून घेऊया याची किंमत किती आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी देशातील नागरिकांना आर्थिक काटकसर पाळण्याचे आवाहन केले होते. परकीय चलन साठा मजबूत राहावा या उद्देशाने त्यांनी सोने-चंदीसह अनावश्यक खर्च कमी करण्याचा तसेच इंधन आणि खाद्यतेलाच्या वापरात बचत करण्याचा सल्ला दिला होता. या आवाहनानंतर बाजारात परिमाण होण्याची चर्चा सुरू असतानाच, कोल्हापूरात घडलेल्या एका अनोख्या लग्नसोहळ्याने पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा: नीट पेपरफुटी प्रकरणात मोठा खुलासा! RCCचे संचालक मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात; 11 तासांच्या चौकशीत काय उघड झालं?

दीड किलो चांदीची किंमत किती?

वधूपित्याने आपल्या जावयाची तब्बल दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल भेट म्हणून दिली असून, या अनोख्या भेटीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या चप्पलची अंदाजे किंमत सुमारे ४ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

लग्नसराईच्या काळात सोने- चांदीच्या वाढत्या किमतींच्या चर्चा सुरू असतानाच, कोल्हापुरात घडलेली ही घटना सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मुलीच्या वडिलांनी आपल्या जावयाची काहीतरी खास आणि वेगळं द्यावं या हेतूने ही चांदीची चप्पल बनवण्याचा निर्णय घेतला.

चांदीची चप्पल बनवण्यासाठी किती दिवस लागले?

ही विशेष ऑर्डर आधी सांगलीतील एका सराफाकडे देण्यात आली होती आणि त्यानंतर कोल्हापूरमधील अनुभवी चांदी कारागिराकडे ती सोपवण्यात आली. कारागिराने आपल्या सहकाऱ्यांसह सुमारे आठ दिवस मेहनत करून पारंपरिक कोल्हापुरी चप्पलसारखी हुबेहूब चांदीची चप्पल तयार केली.

कोल्हापुरी चामड्याच्या चप्पलची रचना

या चप्पलची रचना इतकी आकर्षक आहे की ती पाहताना सामान्य कोल्हापुरी चामड्याच्या चप्पलचीच आठवण येते. या संपूर्ण कामासाठी सुमारे २२ हजार रुपये मजुरी देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, या कारागिराने याआधीही चार ते पाच किलो वजनाची चांदीची पिंपे तयार केली असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्याच्या कारागिरीची सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.

‘धोंड्याच्या महिन्यात’ जावयाला खास भेट

कोल्हापूर आणि सांगली परिसरात ‘धोंड्याच्या महिन्यात’ जावयाला खास भेट देण्याची परंपरा आहे. या परंपरेला जपत, पण त्यात श्रीमंतीचा वेगळा स्पर्श देत या कुटुंबाने चांदीची चप्पल देण्याचा निर्णय घेतला.

सोशल मीडियावरही या अनोख्या भेटीची जोरदार चर्चा सुरू असून, ही चांदीची चप्पल सध्या व्हायरल ठरत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts