Yogi Adityanath | नुकतंच उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी रस्त्यावर नमाज (Namaz) अदा करण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी गंभीर इशारा देखील दिला आहे. लखनौमधील एका कार्यक्रमादरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रस्त्यावर नमाज न अदा करण्याचे निर्देश दिले. तसेच जर तुमच्या घरात जागा नसेल तर संख्या कमी करा, असं खळबळजनक वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.
हेही वाचा – ईडी अॅक्शन मोडमध्ये! दिल्ली-गोव्यात छापेमारी केल्यानंतर ‘आप’ नेत्याला केली अटक, नेमकं प्रकरण काय?
रस्त्यावर नमाज अदा करण्याबाबत नेमकं काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
योगी आदित्यनाथ म्हणाले की, रस्ते हे चालण्यासाठी आहेत. रस्ता अडवण्याचा अधिकार कोणालाही नाहीये. त्यामुळे रस्त्यावर नमाज अदा करू नका. तसेच जर तुमच्या घरात नमाज अदा करायला जागा नसेल तर संख्या नियंत्रणात ठेवा. जर तुमच्याकडे क्षमता नसेल तर तुम्ही संख्या का वाढवत आहात? असा थेट सवाल योगी आदित्यनाथ यांनी केला. तसेच जर घरात जागा कमी असेल तर पाळीपाळीने नमाज अदा करा, असा सल्लाही त्यांनी दिला.
पुढे ते म्हणाले की, जर नमाज अदा करणे आवश्यक असेल तर तुम्ही ती पाळ्यांमध्ये अदा करावी. आम्ही तुम्हाला नमाज अदा करण्यास थांबवणार नाही, पण रस्त्यावर नमाज अदा करायची नाही. रस्ता हा चालण्यासाठी आहे, त्यामुळे आम्ही रस्त्यात अडथळा येऊ देणार नाही. सर्वांना सरकारचे नियम लागू होतात. त्यामुळे आम्ही रस्त्यावर अराजकता माजवू देणार नाही. लोक मला विचारतात की तुमच्या उत्तर प्रदेशमध्ये रस्त्यावर नमाज अदा केली जात नाही का? मी म्हणतो की, अजिबात केली जात नाही. रस्ते हे चालण्यासाठी आहेत आणि त्यांना रस्ता अडवण्याचा काय अधिकार आहे? जिथे जागा आहे तिथे जाऊन नमाज अदा करा.
नमाज पढ़नी है, आप शिफ्ट में पढ़िए…
प्यार से मानेंगे ठीक है, नहीं मानेंगे तो दूसरा तरीका अपनाएंगे… pic.twitter.com/zDoz6YiqTZ
— Yogi Adityanath (@myogiadityanath) May 18, 2026
जर तुम्ही प्रेमाने सहमत असाल तर ठीक आहे, नसाल तर आम्ही दुसरी पद्धत अवलंबू. तुमच्यासोबत संवाद साधणे हे आमचे काम आहे. तुम्ही संवादाला सहमत असाल तरच संवाद साधला जाईल नाहीतर संघर्षही बघा, असा थेट इशार योगी आदित्यनाथ यांनी दिला. तसेच बरेलीमध्ये लोकांनी आपले नशीब आजमावले त्यांनी आपली ताकद पाहिली आहे. जर तुम्हाला व्यवस्थेनुसार जगायचे असेल तर आपण नियम आणि कायद्यांचे पालन करायला सुरुवात केली पाहिजे, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.












