• Home
  • राजकारण
  • UP हादरली! निवडणुकीपुर्वीच अखिलेश यादवांच्या सख्या भावाचा संशयास्पद मृत्यू
Top News

UP हादरली! निवडणुकीपुर्वीच अखिलेश यादवांच्या सख्या भावाचा संशयास्पद मृत्यू

akhilesh prateek

Prateek Yadav Passes Away | उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिवंगत सपा नेते मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव (Prateek Yadav) यांचं निधन झालं आहे. प्रतीक यादव यांनी वयाच्या 38 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – राजस्थान नाही तर महाराष्ट्रातून झाला NEET पेपर लीक; चौकशीत धक्कादायक माहिती समोर

प्रतीक यादव यांच्या निधनानं राजकीय वर्तुळात खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक यादव यांना लखनौच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत अवस्थेत आणण्यात आले होते. यावेळी प्रतीक यादव यांचे मेहुणे आणि अपर्णा यादव यांचे भाऊ अमन बिष्ट हे रुग्णालयात उपस्थित होते. प्रतीक यादव हे आपल्या फिटनेसबाबत खूप गंभीर होते. पण अचानक झालेल्या त्यांच्या निधनाने समाजवादी पक्ष परिवारात मोठी खळबळ उडाली असून त्यांच्या मृत्यूबाबात संशय व्यक्त केला जात आहे.

प्रतीक यादव यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला आहे याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. तसेच आता त्यांचा मृतदेह रुग्णालयात असून लवकरच त्यांचे शवविच्छेदन केले जाणार असून त्यानंतरच त्यांचे मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

प्रतीक यादव हे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक दिवंगत मुलायम सिंह यादव आणि त्यांची दुसरी पत्नी साधना गुप्ता यांचे पुत्र होते. तसेच ते समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे सावत्र भाऊ होते. प्रतीक यादव यांना राजकारणात विशेष रस नव्हता. त्यांना फिटनेस आणि व्यवसाय करण्यामध्ये आवड होती .

दरम्यान, प्रतीक यादव यांच्या आकस्मिक निधनामुळे समाजवादी पक्ष परिवारात शोककळा पसरली आहे. तसेच त्यांच्या अचानक झालेल्या मृत्युमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तर प्रतीक यांच्या मृत्यूबाबत त्यांच्या कुटुंबाकडून अद्याप कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts