• Home
  • लाईफस्टाईल
  • जास्वंदीचा चहा का प्यावा? वाचा शरीरासाठी होणारे फायदे
लाईफस्टाईल

जास्वंदीचा चहा का प्यावा? वाचा शरीरासाठी होणारे फायदे

Hibiscus Tea Benefits

Hibiscus Tea Benefits: तुम्हीही चहा प्रेमी असाल, तर आरोग्यासाठी फायदेशीर असा जास्वंदीचा चहा नक्की ट्राय करा. त्याचे आरोग्यदायी फायदे काय आहेत ते जाणून घ्या.

उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे शरीरात उष्णता वाढणे, थकवा जाणवणे आणि मानसिक अस्वस्थता निर्माण होणे सामान्य आहे. अशा काळात शरीराला थंडावा देणारे आणि आरोग्यदायी पेय घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. जास्वंदीच्या फुलांपासून तयार केला जाणारा चहा हा त्यापैकी एक नैसर्गिक पर्याय मानला जातो.

आयुर्वेदात जास्वंदीच्या फुलांचे अनेक औषधी गुणधर्म सांगितले गेले आहेत. या फुलांपासून तयार होणारा चहा शरीराला ताजेतवाने ठेवण्यास मदत करतो, तसेच उष्णतेमुळे होणारा त्रास कमी करण्यासही उपयोगी ठरू शकतो.

हेही वाचा: नीट पेपरफुटीवरून पुण्यात खळबळ! मॉडर्न कॉलेज प्रशासनाविरोधात आंदोलन; विद्यार्थ्यांची नेमकी काय मागणी?

रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलसाठी उपयुक्त

जास्वंदीच्या चहामध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत होऊ शकते. तसेच खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीही हा चहा उपयुक्त मानला जातो. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठीही याचा फायदा होऊ शकतो.

वजन कमी करण्यास मदत

हा चहा मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत करतो. शरीरातील अतिरिक्त पाणी आणि विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होत असल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काहीजण याचा वापर करतात.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची उपयोगी

जास्वंदीच्या चहातील नैसर्गिक घटक शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात. काही संशोधनांनुसार रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठीही हा चहा सहाय्यक ठरू शकतो.

जास्वंदीचा चहा कसा तयार कराल?

सुकलेली जास्वंदीची फुले एका कप पाण्यात ५ ते ७ मिनिटे उकळवा.
त्यानंतर चहा गाळून घ्या.
चव वाढवण्यासाठी त्यात मध किंवा लिंबाचा रस मिसळू शकता.
दिवसातून एक ते दोन कप चहा पुरेसा मानला जातो.

सेवनापूर्वी घ्या वैद्यकीय सल्ला

कोणतेही नैसर्गिक पेय नियमितपणे आहारात समाविष्ट करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. विशेषतः गर्भवती महिला, कमी रक्तदाब असलेले किंवा नियमित औषधे घेणाऱ्यांनी काळजी घ्यावी.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts