Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राज्य
  • इंधन दरवाढीचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ, सर्वसामान्यांना बसणार मोठा फटका
Top News

इंधन दरवाढीचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ, सर्वसामान्यांना बसणार मोठा फटका

Petrol-Diesel Price Hike | सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसणार आहे. कारण देशात इंधन दरवाढीचा भडका उडताना दिसत आहे. नुकतीच तेल कंपन्यांनी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात वाढ केली आहे. यावेळी तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 0.90 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे.

हेही वाचा – आदिती तटकरेंचं मंत्रीपद धोक्यात? शेळकेंना मंत्रीपदाची लॉटरी?

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ

मागील 5 दिवसांमध्ये तेलाच्या दरात वाढ होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 15 मे रोजी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3.90 रुपयांनी वाढ केली होती. तर आताही पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 0.90 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

आजच्या ताज्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा दर 0.91 रुपयांनी वाढून 107.59 रुपये प्रति लिटर झाला आहे, तर डिझेलचा दर 0.94 रुपयांनी वाढून 94.08 रुपये प्रति लिटर झाला आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर 97.77 रुपयांवरून 98.64 रुपये प्रति लिटर झाला आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 0.96 रुपयांनी वाढून 109.70 रुपये प्रति लिटर झाला आहे, तर डिझेलचा दर 0.94 रुपयांनी वाढून 96.07 रुपये प्रति लिटर झाला आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 0.82 ने वाढून 104.49 झाला असून, डिझेलचा दर प्रति लिटर 0.86 ने वाढून 96.11 झाला आहे.

मध्य पूर्वेतील तणावामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. मध्य पूर्वेतील सध्याच्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात गंभीर व्यत्यय आला आहे. पुरवठ्यातील व्यत्ययामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ₹100 च्या वर गेल्या आहेत. मागील काही महिन्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतीतील या वाढीचा फटका तेल कंपन्यांना बसत होता. मात्र, आता त्यांनी या वाढत्या किमतींचा भार सर्वसामान्य जनतेवर टाकायला सुरुवात केली आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts