Havan At Home Vedic Ritual: कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी घरात हवन केले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की हवन का केले जाते आणि त्याची योग्य विधी तसेच फायदे कोणते आहेत? चला जाणून घेऊया.
कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी घरात हवन केले जाते. मात्र अनेकांना यामागील करणे, योग्य पद्धत आणि त्याचे फायदे नेमके काय आहेत याची पूर्ण माहिती नसते, धार्मिक आणि पारंपरिक मान्यतेनुसार हवन हे वातावरण शुद्ध करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी केले जाते.
हवनाला केवळ धार्मिक विधी म्हणून नव्हे तर मानसिक शांती आणि एकाग्रता वाढवणारी प्रक्रिया म्हणूनही पहिले जाते.
हेही वाचा: RCC क्लासेसची फी आणि सुविधा काय आहेत? जाणून घ्या सविस्तर माहिती
हवन का केले जाते?
हवन करण्यामागे अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक कारणे मानली जातात. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक वातावरण निर्माण करणे हे त्यामागील प्रमुख उद्दिष्ट असते.
तसेच कोणतेही नवीन काम, घरप्रवेश, विवाह किंवा शुभ कार्य सुरू करताना देवतांचे आशीर्वाद मिळावेत यासाठी हवन केले जाते असे मानले जाते.
हवनाची तयारी कशी करावी?
हवन करण्यापूर्वी काही आवश्यक तयारी केली जाते
घरातील जागा स्वच्छ करणे
शांत आणि हवेशीर ठिकाण निवडणे
हवन कुंडाची स्थापना करणे
आवश्यक साहित्य तयार ठेवणे (तूप, लाकूड, हवन सामग्री, कलश, फुले इ.)
हवन करण्याची योग्य पद्धत
हवन करताना काही पारंपरिक नियमांचे पालन केले जाते:
ईशान्य किंवा पूर्व दिशेकडे तोंड करून बसणे
गणपती पूजन करून सुरुवात करणे
अग्नी प्रज्वलित करून पहिली आहुती देणे
प्रत्येक आहुतीसोबत “स्वाहा” उच्चारण करणे
मंत्रोच्चार करत आहुती देणे
“ॐ अग्नये स्वाहा” हा मुख्य मंत्र आहुती देताना वापरला जातो.
हवनाचे फायदे
घरातील वातावरण शुद्ध होते
सकारात्मक ऊर्जा वाढते
मन शांत आणि एकाग्र होते
तणाव कमी होण्यास मदत होते
धार्मिक दृष्ट्या शुभ फळ मिळते






