Vikas Lawande Arrested | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटाचे नेते विकास लवांडे (Vikas Lawande) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. वारकरी संप्रदायाबाबत विकास लवांडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर आता वाघोली पोलिसांनी विकास लवांडेंना अटक केली आहे.
हेही वाचा – ट्विशा शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट! सासूच्या फोन कॉल्समुळे संशय गडद, कुटुंबीयांनी केले गंभीर आरोप
विकास लवाडेंना का करण्यात आली अटक? नेमकं प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वी विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायात घुसखोरी झालेली आहे, असं वक्तव्य करत काही वारकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यामुळे त्यांच्यावर शाईफेक देखील करण्यात आली होती. हा शाईफेकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला होता. तर या प्रकरणी विकास लवांडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर लवांडेंनी जामीनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता. मात्र, पुणे न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीन फेटाळला होता. त्यानंतर लवांडेंवर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
विकास लवांडे यांना अटक केल्यानंतर त्यांची एक पोस्ट समोर आली आहे. या पोस्टमध्ये विकास लवांडे यांचा फोटो देखील शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये ते एका कारमध्ये बसल्याचे दिसत असून त्यांच्या शेजारी पोलीसही बसलेले दिसत आहेत. तसेच हा फोटो शेअर करत विकास लवांडे यांनी म्हटलं आहे की, पुणे पोलिसांची चोर सोडून संन्याशाला फाशी.. माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे गुंड संग्राम भंडारे व इतर सर्व आरोपी मोकाट असून वाघोली पोलीस स्टेशनचे पोलिस एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना मला अटक करण्यासाठी मला फोन न करता रात्री घरी आले मी घरी नव्हतो. कुटुंबीयांना माझ्या अटकेबाबत निरोप दिला कुटुंबांना घाबरवण्याचा हा प्रयत्न होता काय? असा माझा सवाल आहे? पोलीस मला फोन करू शकले असते. मी फरार नाही किंवा माफीवीर नाही.
पुणे पोलिसांची चोर सोडून संन्याशाला फाशी..
माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे गुंड संग्राम भंडारे व इतर सर्व आरोपी मोकाट असून वाघोली पोलीस स्टेशनचे पोलिस एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना मला अटक करण्यासाठी मला फोन न करता रात्री घरी आले मी घरी नव्हतो. कुटुंबीयांना माझ्या… pic.twitter.com/mfODGUBIlb— Vikas Lawande (@VikasLawande1) May 21, 2026
शासनाने मला जरूर अटक करावी मी पोलिसांना सहकार्य करणारा माणूस आहे कारण मी कायदा पाळणारा माणूस आहे, कायदा हातात घेणारा माणूस नाही. सत्यासाठी लढत राहणार सत्याग्रही पद्धतीने जामीन, वकील, दंड देणार नाही. पुणे पोलिसांनी मला जरूर अटक करावी मी तयार आहे. आता मला पुण्यातून पोलीस वाघोली पोलीस स्टेशनला घेऊन चाललेले आहेत, असं लवांडेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.












