• Home
  • ताज्या बातम्या
  • ट्विशा शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट! सासूच्या फोन कॉल्समुळे संशय गडद, कुटुंबीयांनी केले गंभीर आरोप
Top News

ट्विशा शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट! सासूच्या फोन कॉल्समुळे संशय गडद, कुटुंबीयांनी केले गंभीर आरोप

twisha 2

Twisha Sharma Death Case | मॉडेल ट्विशा शर्माच्या मृत्यू प्रकरणाने (Twisha Sharma Death Case) संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली आहे. ट्विशा ही तिच्या भोपाळमधील (Bhopal) सासरच्या घरी संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळली होती. त्यामुळे ट्विशाच्या मृत्यूवरून तिच्या कुटुंबीयांनी तिच्या सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये आता ट्विशाच्या कुटुंबीयांनी तिच्या सासूबाबत गंभीर दावे केले आहेत, ज्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.

हेही वाचा – ठाण्यात आगीचे रौद्ररूप! पहाटेच्या वेळी भाजी मार्केटला लागली भीषण आग, 2 जणांचा होरपळून मृत्यू

ट्विशाच्या कुटुंबीयांनी नेमके काय केले आरोप?

ट्विशाच्या कुटुंबीयांनी दावा आहे की, तिच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी तिची सासू गिरीबाला यांनी 46 फोन केले होते. यामध्ये काही फोन न्यायव्यवस्थेशी संबंधित लोकांना आणि काही नातेवाईकांना केले होते. त्यामुळे आता ट्विशाच्या कुटुंबीयांनी या फोन कॉल्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

ट्विशाच्या कुटुंबीयांनी तिच्या सासून केलेले अनेक फोन नंबर जाहीर केले आहेत. याबाबत त्यांनी आरोप केले आहेत की, ट्विशाच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी तिची सासू गिरिबाला सिंग यांनी अनेक फोन केले होते. त्यापैकी काही फोन न्यायाधीश आणि न्यायमूर्तींसारख्या न्यायव्यवस्थेशी संबंधित लोकांचे होते. हे सर्व फोन ट्विशाच्या मृत्यूनंतरच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 13 मे रोजी करण्यात आले होते. तसेच सीसीटीव्ही फुटेज बसवणाऱ्या तरुणांना देखील गिरिबाला यांच्या नंबरवरूनच फोन करण्यात आला होता, असे दावे ट्विशाच्या कुटुंबीयांनी केले आहेत.

पुढे ट्विशाच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे की, गिरीबाला यांनी केलेल्या सर्व क्रमांकांची चौकशी करण्यात यावी आणि सर्व संबंधित कॉल डिटेल रेकॉर्ड्स, व्हॉट्सॲप चॅट्स आणि बॅकअप्स, कॉल रेकॉर्डिंग, डेटा ट्रान्सफर हिस्ट्री, सीसीटीव्ही कोऑर्डिनेशन रेकॉर्ड्स आणि इतर सर्व संबंधित इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल पुरावे तात्काळ जतन करून सुरक्षित ताब्यात ठेवण्यात यावेत, अशी मागणी ट्विशाच्या घरच्यांनी केली आहे.

दरम्यान, ट्विशाची सासू गिरीबाला सिंग यांनी अटकपूर्व जामीन अर्ज केला असून या अर्जात त्यांनी धक्कादायक दावे केले आहेत. त्यांनी जामीन अर्जात ट्विशाला अमली पदार्थांचे व्यसन असल्याचं म्हटलं आहे. तसेच जर ट्विशाला अमली पदार्थ मिळाले नाहीत, तर तिचे हात थरथरत असायचे. तसेच ट्विशा प्रेग्नंट होती तेव्हा तिच्या वागण्यात बदल झाला होता. अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे ट्विशाने गर्भपातही केला होता. ट्विशाची मानसिक स्थिती चांगली नव्हती, तिच्यावर मानसशास्त्रज्ञाकडून उपचार सुरू होते, असा दावा ट्विशाच्या सासूने केला आहे.

ट्विशाच्या सासूने केलेले हे सर्व दावे तिच्या कुटुंबीय खोटे असल्याचं म्हटलं आहे. तसंच लग्नानंतर अवघ्या पाच महिन्यांत झालेल्या ट्विशाच्या मृत्यूने संपूर्ण प्रकरण गूढ आणि वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ट्विशाच्या कुटुंबीयांनी तिची सासू आणि पती यांच्यावर हुंडा, छळ आणि हत्येचा आरोप केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts