• Home
  • ताज्या बातम्या
  • “ती जिन्यावरून वर गेली अन् अचानक…”, ट्विशाच्या मृत्यूआधी नेमकं घडलं काय? CCTV फुटेजमध्ये दिसली धक्कादायक दृश्य
Top News

“ती जिन्यावरून वर गेली अन् अचानक…”, ट्विशाच्या मृत्यूआधी नेमकं घडलं काय? CCTV फुटेजमध्ये दिसली धक्कादायक दृश्य

twisha

Twisha Sharma Death Case | मॉडेल ट्विशा शर्मा (Twisha Sharma) मृत्यू प्रकरणाने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. 12 मे रोजी ट्विशा शर्मा ही भोपाळमधील तिच्या सासरच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. संशयास्पद स्थितीमध्ये तिचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळला. त्यामुळे ट्विशाच्या मृत्यू प्रकरणाने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अशातच आता ट्विशाचा मृत्यू होण्यापूर्वीच एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये काही धक्कादायक दृश्ये दिसत आहेत.

हेही वाचा –  “अमेरिका आज इराणवर हल्ला करणार…”, डोनाल्ड ट्रम्प यांचा धक्कादायक वक्तव्य, तणाव आणखी वाढणार?

ट्विशाच्या मृत्यूआधी नेमकं काय घडलं? सीसीटीव्ही फुटेमधून काय आलं समोर?

समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेमध्ये दिसत आहे की, ट्विशा ही छताशा दिशेने जिन्यावरून वर जात आहे. त्यानंतर काही वेळानंतर ट्विशा ही बेशुद्ध अवस्थेत दिसत असून तिचा पती समर्थ सिंह आणि त्याच्यासोबत आणखी दोन जण तिला जिन्यावरून खाली नेताना दिसत आहेत. तसेच ट्विशाला जिन्यावर सीपीआर देण्यात आल्याचंही सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.

ट्विशाच्या मृत्यूआधीचं हे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. तसेच ट्विशाच्या आईने समर्थवर गंभीर आरोप देखील केले आहेत. ट्विशाच्या आईने सांगितलं की, समर्थ हा ट्विशाला घाणेरड्या शिव्या द्यायचा, तिचा मानसिक छळ करत होता. तो स्वत: ड्रग्ज घ्यायचा आणि तिला त्रास देत होता. आम्हाला आता न्यायाची कसलीही अपेक्षा नाही. आमचा पोलिसांच्या तपासावर विश्वास नाहीये. आमची इच्छा आहे की हे प्रकरण दिल्लीत ट्रान्सफर करण्यात यावं आणि पुन्हा एकदा पोस्टमार्ट करण्यात यावं, अशी इच्छा ट्विशाच्या आईने व्यक्त केली आहे.

दरम्यान, 2024 मध्ये मॉडेल ट्विशा शर्माची भोपाळचा रहिवासी समर्थ सिंह या वकिलासोबत डेटींग अॅपच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यानंतर ट्विशा आणि समर्थने 2025 मध्ये लग्न केलं होतं. अशातच आता ट्विशा ही तिच्या सासरच्या घरी मृत अवस्थेत आढळल्याने तिच्या घरच्यांनी समर्थ आणि त्याच्या आईवर हत्येचा आरोप केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts