• Home
  • महाराष्ट्र
  • इंधनदरांचा पुन्हा भडका! पेट्रोल 108 रुपये, तर डिझेल…; जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर
ताज्या बातम्या

इंधनदरांचा पुन्हा भडका! पेट्रोल 108 रुपये, तर डिझेल…; जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

fuel price
59

Petrol- Diesel Price Hike India: देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग तिसऱ्यांदा वाढ झाल्याने नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. वाढत्या आंतरराष्ट्रीय तणावामुळे कच्चा तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली असून त्याचा थेट परिणाम देशातील इंधनदरांवर दिसून येत आहे.

15 मे पासून सुरू झालेल्या दरवाढीच्या मालिकेनंतर आता शनिवारी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे दार वाढवण्यात आले आहेत. नव्या दरांनुसार पेट्रोलच्या किंमतीत प्रतिलिटर 87 पैशांची तर डिझेलच्या किमतीत 91 पैशांची वाढ करण्यात आली आहे.

हेही वाचा: बॉक्स ऑफिसवर ‘दृश्यम 3’चा दबदबा; राजा शिवाजी’चा 21 दिवसांचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता…

आधी किती वाढ झाली होती?

15 मे रोजी पेट्रोल 3 आणि डिझेल 3.11 ने महागले
20 मे रोजी पेट्रोल 0.86 आणि डिझेल 0.83 ने वाढले
आता तिसऱ्या वाढीत पेट्रोल 0.87 आणि डिझेल 0.91 ने महागले

अवघ्या काही दिवसांत झालेल्या या सलग वाढींमुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दिल्ली (Delhi)

दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरातही 1 ने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राजधानीत सीएनजीचा दर 81.09 प्रति किलो झाला आहे.

दरवाढीमागचं कारण काय?

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे भारतीय तेल कंपन्यांवर आर्थिक दबाव वाढला आहे. मध्यपूर्वेतील तणाव आणि जागतिक पुरवठा साखळीतील अडचणींमुळे इंधन आयात खर्च वाढत असल्याचे सांगितले जात आहे.

तज्ज्ञांच्या मते, जर जागतिक बाजारातील परिस्थिती अशीच राहिली तर आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी वाढू शकतात.

काही शहरांतील पेट्रोल-डिझेलचे नवे दर

मुंबई (Mumbai)

पेट्रोल – 108.45 प्रति लिटर झाला असून डिझेलची किंमत 95.02 प्रति लिटरपर्यंत पोहोचली आहे.

पुणे (Pune)

पेट्रोल – 108.76
डिझेल – 94.40

नाशिक (Nashik)

पेट्रोल – 109.71
डिझेल – 96.26

नागपूर (Nagpur)

पेट्रोल – 108.97
डिझेल – 95.58

कोल्हापूर (Kolhapur)

पेट्रोल – 109.30
डिझेल – 95.89

सोलापूर (Solapur)

पेट्रोल – 109.14
डिझेल – 95.74

अमरावती (Amravati)

पेट्रोल – 109.15
डिझेल – 95.68

बीड (Beed)

पेट्रोल – 110.38
डिझेल – 96.92

रत्नागिरी (Ratnagiri)

पेट्रोल – 110.44
डिझेल – 97.01

काही जिल्ह्यांत इंधनटंचाई

दरम्यान, राज्यातील काही भागांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवत असल्याचे समोर आले आहे. बुलढाणा, जळगाव आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. इंधनदर वाढीचा परिणाम वाहतूक, भाजीपाला, दैनंदिन वस्तू आणि मालवाहतुकीवर होण्याची शक्यता असल्याने सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts