Breaking News :
  • Home
  • लाईफस्टाईल
  • वारंवार जिने चढताना गुडघेदुखी? ही आहेत मुख्य कारणे आणि उपाय
लाईफस्टाईल

वारंवार जिने चढताना गुडघेदुखी? ही आहेत मुख्य कारणे आणि उपाय

Stair Climbing Knee Pain
50

Stair Climbing Knee Pain: आजकाल अनेक लोकांमध्ये एक गोष्ट सामान वाटते. साधं चालताना काही त्रास होत नाही, पण जिने चढताना किंवा उतरताना गुडघ्यात वेदना जाणवतात. ही केवळ साधी वेदना असून शरीराच्या हालचालीही संबंधित एक महत्वाची समस्या असू शकते. चला तर कोणती आहेत नेमकं कारण जाणून घ्या.

अनेक लोकांना एक गोष्ट कॉमन वाटते साधं चालताना काही त्रास होत नाही, पण जिने चढताना किंवा उतरताना गुडघ्यात वेदना जाणवतात. ही केवळ साधी वेदना नसून शरीराच्या हालचालीशी संबंधित एक महत्त्वाची समस्या असू शकते. विशेषतः जास्त वेळ बसून काम करणारे, व्यायाम न करणारे किंवा वाढत्या वयातील लोकांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते.

हेही वाचा: पटेल-तटकरेंची मक्तेदारी मोडीत; राष्ट्रवादीवर सुनेत्रा पवारांचा ताबा!

जिने चढताना गुडघ्यावर जास्त ताण का येतो?

सपाट रस्त्यावर चालताना शरीराचं वजन दोन्ही पायांवर संतुलित राहतं. पण जिने चढताना एका पायावर पूर्ण शरीराचं वजन येतं आणि त्याच वेळी त्या पायाने शरीर वर उचलावं लागतं. यामुळे गुडघ्यावरचा दबाव अचानक वाढतो आणि वेदना जाणवू लागतात.

‘पटेला’वर वाढणारा दबाव

गुडघ्याच्या पुढच्या भागात ‘पटेला’ (knee cap) नावाचं हाड असतं. जिने चढताना या हाडावर आणि मांडीच्या हाडावर जास्त घर्षण होतं. विशेषतः बसलेल्या अवस्थेतून उठताना किंवा जिने उतरताना हा दबाव अधिक वाढतो. त्यामुळे गुडघ्याच्या पुढील भागात वेदना निर्माण होतात.

ही समस्या कोणाला जास्त होते?

मांडीचे स्नायू कमकुवत असलेले लोक
जास्त वजन असलेले व्यक्ती
दिवसभर बसून काम करणारे (sedentary lifestyle)
व्यायामाचा अभाव असलेले लोक

वेदना टाळण्यासाठी काय कराल?

नियमित व्यायाम आणि स्ट्रेचिंग करा
मांडीचे स्नायू मजबूत करा
वजन नियंत्रणात ठेवा
जिने चढताना घाई करू नका
गरज वाटल्यास फिजिओथेरपीचा सल्ला घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts