• Home
  • देश
  • भारताची हवाई ताकद आणखी वाढणार; फ्रान्ससोबत भारताचा मेगा डिफेन्स डील, 114 राफेल विमानांची चर्चा
Top News

भारताची हवाई ताकद आणखी वाढणार; फ्रान्ससोबत भारताचा मेगा डिफेन्स डील, 114 राफेल विमानांची चर्चा

rafale

Indian Air Force | भारतीय लष्कराची (Indian Army) ताकद आता आणखी वाढणार आहे. कारण भारताने फ्रान्ससोबत (France) मोठी डिल केली आहे. भारत आपल्या हवाई दलाला बळकट करण्यासाठी आता अधिक राफेल लढाऊ विमानं (Rafale Fighter Jets) खरेदी करणार आहे. त्यासाठी भारताने 114 राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठीच्या मागणी पत्राला अंतिम स्वरूप दिले असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य, आत्महत्येमागे नेमकं कारण काय? वडिलांनी केला मोठा खुलासा

90 राफेल विमाने भारतात निर्मिती होणार?

आपल्या हवाई दलाचा ताफा मजबूत करण्याच्या आणि लढाऊ विमानांची कमतरता दूर करण्याच्या भारताच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या योजनेतील हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. त्यामुळे आता भारताची हवाई ताकद आणखी वाढणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, 114 लढाऊ विमानांपैकी सुमारे 90 विमाने फ्रेंच एरोस्पेस क्षेत्रातील दिग्गज कंपनी डसॉल्ट एव्हिएशन आणि एका भारतीय कंपनीच्या भागीदारीतून भारतात तयार केली जाणार आहेत.

फ्रान्सने किंमत, उपलब्धता आणि लॉजिस्टिकल समर्थनाविषयी सविस्तर माहिती दिल्यानंतर भारत औपचारिकपणे प्रस्तावासाठी विनंती (RCP) जारी करणार आहे. दोन्ही देशांमधील वाटाघाटींनंतर, करारावर स्वाक्षरी होण्यापूर्वी सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीला अंतिम करारास मंजुरी द्यावी लागेल. या वर्षाच्या अखेरपर्यंत हा करार पूर्ण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

शिफारसपत्र हा एक औपचारिक सरकारी दस्तऐवज आहे, जो परदेशी लष्करी विक्री किंवा आंतर-सरकारी कराराअंतर्गत खरेदी प्रक्रिया सुरू करण्यासाठी वापरला जातो. यामध्ये आवश्यक क्षमता, संख्या आणि तांत्रिक वैशिष्ट्यांचा तपशील असतो. तर संरक्षण खरेदी परिषदेने राफेल प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर तीन महिन्यांनी शिफारसपत्र तयार करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts