Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • भविष्य
  • डिसेंबरपर्यंत शनीची उलटी चाल; ‘या’ राशींसाठी पुढील काही महिने ठरणार कठीण
धार्मिक

डिसेंबरपर्यंत शनीची उलटी चाल; ‘या’ राशींसाठी पुढील काही महिने ठरणार कठीण

Saturn Retrograde 2026: मेच्या शेवटापासून शनिदेवाची चाल बदलणार असून ते वक्री अवस्थेत जाणार आहेत. या बदलाचा काही राशींवर अधिक परिणाम दिसून येऊ शकतो. विशेषतः मेष, कुंभ आणि मीन राशीच्या व्यक्तींना या काळात अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

ज्योतिषशास्त्रात शनीला कर्मानुसार फळ देणारा ग्रह मानले जाते. त्यामुळे शनीच्या स्थितीत बदल झाला की त्याचा परिणाम व्यक्तीच्या आयुष्यात विविध स्वरूपात दिसतो. २७ जुलैपासून शनी मीन राशीतच वक्री होणार असून डिसेंबरपर्यंत ही स्थिती कायम राहणार आहे. या काळात काही राशींसाठी अडथळे, ताणतणाव आणि अनपेक्षित बदल संभवतात.

हेही वाचा: कुर्बानी वाद पेटला; विरोधानंतर भाजप नगरसेविका प्रीती साटम यांना धमकीचे फोन

मेष राशी

या काळात कामाच्या ठिकाणी काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. कामाचा ताण वाढू शकतो तसेच वरिष्ठ किंवा सहकाऱ्यांशी मतभेद होण्याचीही शक्यता आहे. अपेक्षित यश मिळण्यास विलंब होऊ शकतो आणि त्याचा परिणाम वैयक्तिक आयुष्यातील तणाव वाढण्यावर होऊ शकतो.

कुंभ राशी

कुंभ राशीसाठी हा काळ आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगण्याचा आहे. गुंतवणुकीत धोका संभवतो आणि चुकीचे निर्णय नुकसानकारक ठरू शकतात. कामावर लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येऊ शकतात. तसेच, नातेसंबंधांमध्ये गैरसमज वाढण्याची शक्यता आहे.

मीन राशी

मीन राशीच्या लोकांसाठी मानसिक आणि व्यावसायिक आव्हाने वाढण्याची शक्यता आहे. मनःस्थिती अस्थिर राहू शकते तसेच कामात अडथळे निर्माण होऊ शकतात. मित्र किंवा नातेवाईकांशी वाद होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे संयम राखणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल.

या गोष्टी ठेवा लक्षात

शनिवारी शनी मंत्राचा जप करणे लाभदायक ठरू शकते.
पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावणे शुभ मानले जाते.
गरजू लोकांना मदत केल्यास सकारात्मक परिणाम मिळू शकतात.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts