• Home
  • राजकारण
  • लाडकी बहिण योजनेत अपहार! मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल होणार? खासदाराची थेट मागणी
Top News

लाडकी बहिण योजनेत अपहार! मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल होणार? खासदाराची थेट मागणी

Ladki Bahin Scheme Scam

Ladki Bahin Scheme Scam : लाडकी बहिण योजनेत अपहार करणाऱ्या सत्तेतील मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी थेट मागणी एका खासदाराने केली आहे. सरकारने केवायसीचे कारण पुढे करत राज्यातील तब्बल ८० लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवले. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे विरोधकांकडून जोरदार टीकास्त्र डागले जात आहे. विजय वडेड्डीवार, जयंत पाटील आणि संजय राऊत या महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांना सरकार हल्ला चढवला आहे. त्याचबरोबर ही महिलांची फसवणूक असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी आता पुढे आली आहे.

ठाकरे यांच्या शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोला केला. राऊतांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी जनतेच्या तिजोरीचा अपहार करून अपात्र महिलांना पैसे देऊन मते विकत घेतली. ही निवडणूकच रद्द व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीने महिलांची मते विकत घेतली.

८० लाख अपात्र महिनांना १७,५१४० कोटी रुपयांचे वाटप

निवडणूका डोळ्यासमोर ठेवून जर ८० लाख अपात्र महिनांना १७,५१४० कोटी रुपयांचे वाटप झाले असेल आणि सरकार ते पैसे परत घेणार नसेल तर ज्यांच्या सहीने पैसे वाटले असतील त्या एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या पक्षाची संपत्ती जप्त करावी, आणि सरकारच्या तिजोरीत पैसे भरावे. अपात्र 80 लाखाच्या वर अपात्र महिलांना तुम्ही सरकारी तिजोरीतून पैसे दिले हे आता सिद्ध झाले. लाडकी बहीण योजनेचा अपहार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे जे त्रिकुट होते, त्यांच्यावरती सरकारी तिजोरीच्या अपहाराचा गुन्हा दाखल होणे गरजेचे असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.

काँग्रेसवाले संस्थानं वाचवण्यासाठी शेपट्या घालून भाजपात गेले

संजय राऊत पुढे म्हटले की, एखादी निवडणूक हारली म्हणजे शिवसेना कमकुवत झाली, असे नाही. आता निवडणुका नाहीत, त्यामुळे पक्षबांधणीचे काम सुरू. काँग्रेसवाले आपली संस्थानं वाचवण्यासाठी शेपट्या घालून भाजपमध्ये गेले. या लोकांना पक्ष नसतो, जिकडे हवा तिकडे हे लोक जातात. उद्या केंद्रात राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सरकार आले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तर हेच लोक आमच्या पायाशी लोटांगण घालतील.

तेंव्हाच आम्ही त्यांना श्रद्धांजली दिली

सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्याच बाजूने लागेल. त्यामुळेच निकाल लांबवला जातोय. ज्यांना पश्चाताप होतोय, त्यांनी परत यावं. मात्र काही लोकांना प्रवेश मिळणार नाही, असं शिवसेना पक्ष सुनावणीवर राऊत बोलले. विखे पाटील आमच्याही पक्षात आले होते. आम्हाला सोडून गेले, तेंव्हाच आम्ही त्यांना श्रद्धांजली दिली. एखादी निवडणूक हारली म्हणजे शिवसेना कमकुवत झाली, असे नाही. आता निवडणुका नाहीत, त्यामुळे पक्षबांधणीचे काम सुरू. काँग्रेसवाले आपली संस्थानं वाचवण्यासाठी शेपट्या घालून भाजपमध्ये गेले. या लोकांना पक्ष नसतो, जिकडे हवा तिकडे हे लोक जातात. उद्या केंद्रात राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सरकार आले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तर हेच लोक आमच्या पायाशी लोटांगण घालतील, असं संजय राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts