Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • बिजनेस
  • सर्वसामान्यांना जबरी धक्का, घरगुती सिलेंडर पुन्हा महागला
Top News

सर्वसामान्यांना जबरी धक्का, घरगुती सिलेंडर पुन्हा महागला

Domestic LPG Cylinder Price Hike : बाजारात जावं तर महागाईचा असा काही सुळसुळाट सुटलाय की वाटतं माणसाने जगावं की मरावं? आमचा हा काळजाचा आक्रोश, ही डोळ्यातली आसवं कोणाला तरी दिसणार आहेत का? की आमच्या नशिबाचा हा कोळसा असाच धगधगत राहणार? गेल्या काही महिन्यापासून गरिबाच्या संसाराला महागाईची अशी काही आग लागलीये की विचारूच नका. ज्यावर आपण जेवण बनवतो त्या सिलेंडरचा भाव आता पुन्हा वाढलाय, सर्वसामान्य लोकांच्या पदरात काय पडलं, तर फक्त महागाईचे चटके.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मागील मे महिन्यापासून तब्बल चार वेळा वाढल्या होत्या. तोच जूनच्या सुरुवातीला घरगुती गॅस सिलिंडरनेही इंगा दाखवला. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत एकाच वेळी २९ रुपयांची वाढ करण्यात आली. आधीच मार्च महिन्यात गॅस ६० रुपयांनी वाढला होता, आणि आता पुन्हा ही २९ रुपयांची झळ बसल्यामुळे गॅस सिलिंडर गरिबाच्या आवाक्याबाहेर गेलाय. या दरवाढीमुळे सर्वसामान्य महिलांचे कंबरडे पार मोडून गेले आहे. खेड्यापाड्यातील माऊलीला विचारा, संसाराचा गाडा हाकताना तिच्या नाकात कसा दम येतोय. गॅस सिलेंडर महागल्यामुळे कित्येक घरांमधल्या शेगड्या आता शोभेच्या वस्तू बनल्या आहेत.

खेड्यापाड्यात आणि मध्यम वर्गीय शहरात पुन्हा चुली पेटल्या

गावातल्या बायका पुन्हा एकदा डोक्यावर लाकडाची मोळी वाहून आणण्यासाठी जंगलात पायपीट करू लागल्या आहेत. तोच जुना काळा धूर, तीच डोळ्यात जाणारी जळजळ आणि तोच खोकला गरिबाच्या पाचवीला पुजलाय. पेट्रोल-डिझेल महागल्यामुळे फक्त गाड्या चालवणं महागलं नाही, तर एसटीचं भाडं वाढलं, भाजीपाल्याची वाहतूक महागली आणि किराणा सामानाचे भाव गगनाला भिडले. दुकानात गेल्यावर शंभर रुपयाची नोट अशी विरून जाते की हातात दोन वस्तूही धड येत नाहीत. घरात धान्याचा दाणा नसताना आणि गॅस संपलेला असताना जी हतबलता येते, ती फक्त एका आईलाच समजू शकते.

महिलांच्या डोळ्यातील अश्रूंचे रुपांतर संतापात होऊ लागले

गावातल्या पारावर, विहिरीवर पाणी भरताना प्रत्येक माऊलीच्या तोंडून एकच वाक्य बाहेर पडतंय की, सरकारने आम्हाला उज्ज्वला योजनेची स्वप्ने दाखवून गॅस तर दिला, पण आता तो भरायचा कुठून? महिला म्हणतात की, मतांच्या वेळी आमच्या पाया पडणारे नेते आता आमची ही दुरवस्था पाहायला का येत नाहीत? महिलांचा हा राग आता शांत बसणारा नाही, त्यांच्या डोळ्यातल्या पाण्याचे रूपांतर आता संतापात होऊ लागले आहे. रोजच्या जगण्यासाठी होणारी ही धडपड आणि हक्काच्या दोन घासासाठी करावी लागणारी वणवण सर्वसामान्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहे.

पैसे देऊनही सिलेंडर मिळेनासा झालाय

काही गावांमध्ये अन् वाड्या-वस्त्यांवर तर अशी परिस्थिती निर्माण झालीये की खिशात दोन-दोन हजार रुपये असूनही लोकांना गॅस मिळायला तयार नाही. पैसा फेको, तमाशा देखो अशी म्हण आहे, पण इथे गरिबाने हक्काचे पैसे हातावर ठेवूनही वेळेवर गॅस सिलेंडर घरी येत नाहीये. काळाबाजार करणाऱ्यांनी आणि साठेबाजांनी असा काही सुळसुळाट मांडलाय की गरिबाच्या तोंडचा घास हिरावून घेतला जातोय. दोन हजार रुपये म्हणजे एका मजुराची आठवड्याची कमाई असते. ती संपूर्ण कमाई गॅसवर फुंकायला सामान्य माणूस तयार आहे, कारण पोटाची आग मोठी असते. पण इतके पैसे देऊनही जर सिलेंडरसाठी एजन्सीचे उंबरठे झिजवावे लागत असतील, तर मग या व्यवस्थेने सर्वसामान्यांची क्रूर चेष्टाच मांडली आहे, असे म्हणावे लागेल.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts