Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • ठाकरे सेना फुटली! शिंदेचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी? 7 खासदार गळाला…
Top News

ठाकरे सेना फुटली! शिंदेचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी? 7 खासदार गळाला…

Operation Tiger Shinde

Operation Tiger Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २०२२ च्या एकनाथ शिंदे बंडानंतर उद्धव ठाकरे गटात फूट पडली होती, तसाच प्रकार आता उलट दिशेने घडण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. ठाकरे गटातील तब्बल ७ खासदार शिंदे गटात सामील होण्याच्या उंबरठ्यावर असल्याचे संकेत मिळत आहेत.

सूत्रांनुसार, ७ जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत ठाकरे गटातील या खासदारांची गुप्त बैठक घेतली. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ही हालचाल वेगाने सुरू झाली असल्याचे सांगितले जाते. या बैठकीत एका खासदाराला केंद्रीय मंत्री पदाची आणि इतरांना महत्त्वाची पदे किंवा मान्यता देण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती आहे. मराठवाड्यातील एका खासदाराच्या नावाची विशेष चर्चा रंगली आहे.

सातत्याने संपर्क आणि डिनर डिप्लोमसी

गेल्या काही महिन्यांपासून शिंदे गटाकडून ठाकरे गटातील खासदारांशी सातत्याने संपर्क साधला जात आहे. श्रीकांत शिंदे यांनी यापूर्वीही स्वतंत्र भेटी घेतल्या होत्या. प्रतापराव जाधव यांच्या दिल्लीतील बंगल्यावरही अशा बैठका झाल्याचे समोर आले आहे. मुंबईतील दोन खासदार वगळता ठाकरे गटातील एकूण ९ पैकी पैकी ७ खासदार या फुटीच्या प्रक्रियेत असल्याची चर्चा आहे. शिंदे यांनी ठाकरे गटाच्या खासदारांशी भेट घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतल्याचे सांगितले जाते. या सर्व रणनीतीमागे ‘ऑपरेशन टायगर’ सारखी मोहीम सक्रिय असल्याचे बोलले जात आहे.

ठाकरेंकडे फक्त दोनच खासदार?

जर ही फूट प्रत्यक्षात उतरली तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (UBT) गटाकडे फक्त दोन खासदार उरतील, असे चित्र निर्माण होईल. यामुळे ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसू शकतो. मात्र, अद्याप दोन्ही बाजूंकडून यासंबंधी अधिकृत पुष्टी किंवा नाकारणी आलेली नाही. अशा बातम्या वारंवार येत असतात आणि काही वेळा राजकीय दबाव किंवा चर्चा वाढवण्यासाठीही वापरल्या जातात. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भाजपच्या वाढत्या प्रभावामुळे दोन्ही शिवसेना गटांमध्ये अस्वस्थता दिसत आहे. काही नेते एकत्र येण्याचीही चर्चा रंगली आहे, तर काही ठिकाणी फोडाफोडीचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसते.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts