Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • पांढऱ्या कपड्यांवरील पिवळे डाग काढायचे आहेत? ‘या’ सोप्या घरगुती उपायांनी शर्ट पुन्हा चमकेल नव्यासारखा!
ताज्या बातम्या

पांढऱ्या कपड्यांवरील पिवळे डाग काढायचे आहेत? ‘या’ सोप्या घरगुती उपायांनी शर्ट पुन्हा चमकेल नव्यासारखा!

Remove Yellow Stains Clothes

Remove Yellow Stains Clothes: तुम्हीही पांढऱ्या कपड्यांवरील पिवळ्या डागांमुळे त्रस्त झाला आहात का? मग काळजी करू नका. घरच्या घरी काही सोप्या उपायांनी तुमचं शर्ट पुन्हा नव्यासारखं चमकू शकतं

पांढरा शर्ट किंवा टी-शर्ट घालणे अनेकांना आवडते, मात्र घामामुळे अंडरआर्म भागात पडणारे पिवळे डाग कपड्यांची शोभा कमी करतात. हे डाग इतके हट्टी असतात की साध्या धुलाईनेही सहज जात नाहीत. त्यामुळे अनेकजण महागडे क्लिनिंग प्रोडक्ट्स वापरतात, तरीही अपेक्षित परिणाम मिळत नाही. पण काही घरगुती उपायांच्या मदतीने हे पिवळे डाग सहज दूर करता येतात.

हेही वाचा : बुधवारी ग्रहांचा मोठा फेरबदल! ‘या’ राशींचे नशीब उजळणार, करिअर आणि आर्थिक लाभाचे संकेत

पिवळे डाग तयार का होतात?

घामामुळे थेट पिवळे डाग पडत नाहीत. घामातील मीठ आणि नैसर्गिक घटक जेव्हा डिओडरंट किंवा अँटीपर्सपिरंटमधील रसायनांशी, विशेषतः अॅल्युमिनियमशी प्रतिक्रिया करतात, तेव्हा कपड्यांवर पिवळसर डाग तयार होतात. वेळ जसजसा जातो, तसतसा हा रंग अधिक गडद होतो आणि काढणे कठीण बनते.

बेकिंग सोडा आणि हायड्रोजन पेरॉक्साइडचा उपाय

पिवळे डाग दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो.

१/४ कप हायड्रोजन पेरॉक्साइड
१/४ कप बेकिंग सोडा
थोडे पाणी

हे सर्व घटक मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट डांगावर लावा आणि हलक्या हाताने ब्रशने घास. सुमारे २० ते ३० मिनिटे तसेच ठेवून नंतर कपडा धुवा. यामुळे डाग हलके होण्यास मदत होते.

व्हिनेगर आणि लिंबाचा पर्याय

जर हायड्रोजन पेरॉक्साइड उपलब्ध नसेल, तर पांढरा व्हिनेगर वापरू शकता. डागांवर व्हिनेगर लावून अर्धा तास ठेवावा आणि नंतर धुवावे.

लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा यांचे मिश्रणही पिवळे डाग कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. हे मिश्रण लावून काही वेळ ठेवल्यास डाग सैल होतात आणि धुण्यास सोपे जातात.

कपडे धुताना लक्षात ठेवा

डाग पूर्णपणे निघेपर्यंत कपडा ड्रायरमध्ये टाकू नका
शक्य असल्यास नैसर्गिक हवेत वाळवा
डाग दिसताच लगेच साफ करण्याचा प्रयत्न करा
गरज भासल्यास प्रक्रिया पुन्हा करा

वेळीच योग्य काळजी घेतल्यास पांढरे कपडे पुन्हा स्वच्छ आणि नवीनसारखे दिसू शकतात.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts