ताज्या बातम्याTop Newsगुन्हा

नसरापूर चिमुकली अत्याचार-हत्या प्रकरणात आरोपी दोषी; विशेष न्यायालयाचा नेमका काय निकाल?

Nasrapur Case: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षाच्या चिमुकल्या मुलीवरील अत्याचार आणि हत्येच्या अत्यंत संवेदनशील प्रकरणाचा निकाल आज २५ जूनला न्यायालयाकडून निकाल येणार आहे.

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याला दोषी ठरवले आहे. राज्यभरात संतापाची लाट उसळलेल्या या प्रकरणातील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

हेही वाचा: आषाढी यात्रेला प्रारंभ! मुसळधार पावसातही भक्तीचा जल्लोष; मुक्ताई पालखी पंढरपूरकडे रवाना

Nasrapur Case : न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

पुण्यातील विशेष न्यायालयाने गुरुवारी (२५ जून) निकाल देताना आरोपीविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या विविधकलमांमधील आरोपी सिद्ध झाल्याचे नमूद केले. विशेष न्यायाधीश एस. आर. सांळुखे यांनी पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि वैज्ञानिक तपास अहवालांचा आधार घेत हा निर्णय दिला.

या प्रकरणात आरोपीविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने सर्व पुराव्यांचा सखोल विचार करून आरोपीला दोषी ठरवले.

Nasrapur Case : तपासात काय उघड झाले?

१ मे २०२६ रोजी घडलेल्या या घटनेत आरोपीने चिमुकलीला खाऊ देण्याचे आमिष दाखवून एकांतस्थळी नेल्याचा आरोप आहे. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह गोठ्याजवळील शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले.

घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये आरोपी मुलीसोबत दिसून आल्याने त्याची ओळख पटली आणि अल्पावधीतच त्याला अटक करण्यात आली. (Latest Marathi News)

जलदगतीने पूर्ण झाली सुनावणी

या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. जनतेच्या संतापाच्या पार्श्वभूमीवर तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया वेगाने राबवण्यात आली. पोलिसांनी अल्पावधीत दोषारोपपत्र दाखल केले, तर विशेष न्यायालयाने दैनंदिन सुनावणी घेत प्रकरणाचा निपटारा केला.

या खटल्यात अनेक साक्षीदार, डीएनए अहवाल, वैद्यकीय पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेज न्यायालयासमोर सादर करण्यात आले होते.

हेही वाचा: आता तुकाराम मुंढे यांची बदली होणार का नाही? विधानसभेत नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केली भूमिका

सुनावणीदरम्यान काय घडले?

दोषी ठरवल्यानंतर न्यायालयाने आरोपीला शिक्षेबाबत काही सांगायचे आहे का, अशी विचारणा केली. त्यावेळी आरोपीने घटनेबाबत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायालयाने त्याला गुन्हा सिद्ध झाल्याचे स्पष्ट करत शिक्षेबाबतच आपले म्हणणे मांडण्यास सांगितले. यानंतर आरोपीकडून कोणतेही ठोस उत्तर देण्यात आले नाही. (LS Marathi News Channel)

पुढील टप्पा : शिक्षेची सुनावणी

दोष सिद्ध झाल्यानंतर आता शिक्षेच्या प्रमाणावर न्यायालय निर्णय देणार आहे. आरोपीविरुद्ध लागू असलेल्या काही गंभीर कलमांमध्ये मृत्युदंडाची तरतूद आहे. तर अन्य कलमांनुसार जन्मठेप किंवा दीर्घकालीन कारावासाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे आता न्यायालय आरोपीला कोणती शिक्षा सुनावते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Monika shinde

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *