Rohit Pawar: शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. सरकारसमोर त्यांनी कोणत्या प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत? जाणून घेऊया सविस्तर
राज्यातील शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी पुन्हा आंदोलनाची भूमिका घेतली आहे. पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन मागे घेतल्यानंतर सरकारने दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झाले नसल्याचा आरोप करत त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये हजारो शेतकऱ्यांसह विराट मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे सरकारवर राजकीय आणि प्रशासकीय दबाब वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
हेही वाचा: नसरापूरच्या आरोपीला फाशीच! 15 दिवसांत चार्जशीट तर 55 दिवसांत निकाल; कोर्टानं काय म्हटलं?
आंदोलनाची पार्श्वभूमी काय?
काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये “अन्नदात्यासाठी अन्नत्याग” आंदोलन सुरू केले होते. त्यावेळी सरकारच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, त्यानंतरही ठोस निर्णय न झाल्याचा आरोप करत रोहित पवार पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत.
त्यांच्या मते, सरकारने आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे विधानसभेतील चर्चेपेक्षा जनआंदोलनातून सरकारला जाग आणण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
संभाजीनगरात आंदोलन
छत्रपती संभाजीनगरमधील केंब्रिज चौकात हजारो शेतकरी, शेतमजूर आणि महिला आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनामुळे संभाजीनगर-जालना महामार्गावर वाहतुकीचा मोठा परिणाम झाला. आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलन शांततेत पार पडावे यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली होती.
रोहित पवार यांनी आंदोलनादरम्यान स्पष्ट केले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू असूनही दडपशाहीचा प्रयत्न झाल्यास राज्यभर आंदोलनाचा विस्तार करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
कर्जमाफीवर नेमका वाद काय?
या आंदोलनाचा केंद्रबिंदू म्हणजे राज्य सरकारची नवीन कर्जमाफी योजना. रोहित पवार (Rohit Pawar) यांचा आरोप आहे की, योजनेतील अटी इतक्या कठीण आहेत की मोठ्या संख्येने शेतकरी लाभापासून वंचित राहतील.
त्यांच्या मते, दोन लाख रुपयांपेक्षा थोडे अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाही आधी अतिरिक्त रक्कम भरावी लागते. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही अट व्यवहार्य नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच यापूर्वीच्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या अनेक शेतकऱ्यांनाही नवीन योजनेतून वगळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
रोहित पवारांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
रोहित पवारांनी (Rohit Pawar) या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारच्या समोर चार प्रमुख आणि अत्यंत महत्त्वाच्या मागण्या ठेवल्या आहेत, ज्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
१. पहिली मागणी म्हणजे, कोणत्याही अटी व शर्तींशिवाय सर्व प्रकारच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची विनाअट सरसकट कर्जमाफी तात्काळ लागू करण्यात यावी.
२.दुसरी मागणी म्हणजे, नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, म्हणून त्यांना एक लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे.
३. तिसरी महत्त्वाची मागणी पीकविमा योजने संदर्भातील आहे. मागील वर्षी महायुती सरकारने केवळ १ रुपयात पीकविमा देण्याची घोषणा केली होती, परंतु विम्याच्या नियमावलीतील महत्त्वाचे चार ‘ट्रिगर’ सरकारने गुपचूप बदलल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
मागील वर्षी एकट्या हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सुमारे साडेचार लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांचे एकूण नुकसान १७ हजार कोटी रुपयांच्या घरात असताना, नवीन नियमांमुळे विमा कंपन्यांनी संपूर्ण राज्यात केवळ १,२०० कोटी रुपयांची तुटपुंजी भरपाई दिली. म्हणूनच, पीकविम्याचे ते जुने चार ट्रिगर पूर्ववत सुरू करून विमा कंपन्यांची मनमानी थांबवावी आणि शेतकऱ्यांना हेक्टरी योग्य नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. चौथी मागणी म्हणजे, मागील काही वर्षांत अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची थकीत मदत शासनाने तात्काळ वितरीत करावी.
विरोधकांची एकजूट
या आंदोलनात विरोधी पक्षातील अनेक नेते सहभागी झाले. खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री राजेश टोपे तसेच इतर अनेक नेत्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.
विरोधी पक्षांच्या उपस्थितीमुळे या आंदोलनाला केवळ पक्षीय स्वरूप न राहता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकत्रित लढा म्हणून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आंदोलकांना संबोधित करताना आमदार रोहित पवार भावूक
केंब्रिज चौकातील भर उन्हात रस्त्यावर बसून आंदोलकांना संबोधित करताना आमदार रोहित पवार भावूक झाले होते, परंतु त्यांच्या आवाजातील आक्











Comments are closed