Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पिंपरी-चिंचवड हादरले! मोशीतील कचऱ्याचा ढिगारा कोसळून 14 ते 15 जण अडकल्याची भीती; रेस्क्यू ऑपरेशन सुरू
Pune

पिंपरी-चिंचवड हादरले! मोशीतील कचऱ्याचा ढिगारा कोसळून 14 ते 15 जण अडकल्याची भीती; रेस्क्यू ऑपरेशन सुरू

Moshi Accident

Moshi Accident: मुसळधार पावसामुळे कचरा आणि मातीचा ढिगारा घसरला असून स्ट-टू-एनर्जी प्रकल्पाची इमारत कोसळली आहे. यात जवळपास 14 ते 15 जण अडकल्याची माहिती समोर आली आहे.

शहरातील मोशी कचरा डेपो परिसरात (Moshi Accident) बुधवारी दुपारी भीषण दुर्घटना घडली. मुसळधार पावसामुळे कचरा आणि मातीचा मोठा ढिगारा घसरून जवळच असलेल्या तीन मजली इमारतीवर कोसळला. या दुर्घटनेत 14 ते 15 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, प्राथमिक माहितीनुसार काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेनंतर पिंपरी- चिंचवड महानगरपालिका. अग्निशमन दल, पोलीस आणि NDRFच्या पथकांकडून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

हेही वाचा: आळंदी जलमय! इंद्रायणीचे चारही पूल पाण्याखाली, वारकऱ्यांसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

नेमकी घटना कशी घडली? (Moshi Accident)

मोशी कचरा डेपो परिसरात असलेल्या वेस्ट- टू- एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतींवर कचरा आणि मातीचा मोठा भाग अचानक घसरला. या ढिगाऱ्याच्या दाबमुळे तीन मजली इमारत कोसळली. ही इमारत या प्रकल्पाच्या व्यवस्थापन आणि प्रशासकीय वापरली जात होती. दुर्घटना घडली त्यावेळी इमारतीमध्ये कर्मचारी उपस्थित असल्याची माहिती आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

बचावकार्याला सुरुवात

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. ढिगारा मोठ्या प्रमाणात असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत.

ढिगारा हटवण्यासाठी

जेसीबी
पोकलेन मशीन
क्रेन
अत्याधुनिक बचाव उपकरणे यांचा वापर केला जात आहे.

अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी NDRFचे जवानही घटनास्थळी दाखल झाले असून शोध आणि बचाव मोहीम सुरू आहे.

प्रशासन अलर्ट मोडवर (Moshi Accident)

दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी, पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सक्रिय झाले आहेत.

घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित असून बचावकार्याचा आढावा घेतला जात आहे. जखमींना तातडीने उपचार मिळावेत यासाठी जवळच्या रुग्णालयांना सतर्क ठेवण्यात आले आहे.

मोशी कचरा डेपोवर पुन्हा प्रश्नचिन्ह

या दुर्घटनेनंतर मोशी कचरा डेपोच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा साठवला जात आहे.

पावसाळ्यात कचऱ्याचे ढिगारे घसरण्याचा धोका असताना सुरक्षेच्या उपाययोजना पुरेशा होत्या का? तसेच या परिसरातील बांधकाम आणि सुरक्षिततेचे नियम पावले गेले होते का? याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.

पावसाळ्यात कचरा आणि माती घसरण्याचा धोका

मुसळधार पावसामुळे जमिनीतील ओलावा वाढतो. त्यामुळे मोठे कचरा किंवा मातीचे ढिगारे अस्थिर होऊ शकतात. विशेषतः वर्षानुवर्षे साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमध्ये पाणी मुरल्याने त्यांचे वजन वाढते आणि घसरण्याचा धोका निर्माण होतो. अशा घटनांना रोखण्यासाठी नियमित सुरक्षा तपासणी, योग्य नियोजन आणि पावसाळ्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असते.

पुढील तापसाकडे लक्ष

मोशी दुर्घटनेनंतर बचावकार्याला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येत आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी यंत्रणा प्रयत्न करत आहे.
या दुर्घटनेची कारणे, सुरक्षेतील त्रुटी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणती पावले उचलली जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts