Best Indoor Plants for a 1 BHK Home: घर लहान असलं तरी त्याला हिरवाईचा सुंदर स्पर्श देता येतो. कमी जागेत आणि कमी देखभालीत वाढणारी ही इनडोअर झाडे तुमच्या १ BHK घराची शोभा नक्कीच वाढवतील.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत घरातील झाडांची काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. अनेकांना घरात हिरवळ आणि निसर्गाचा स्पर्श हवा असतो, पण कमी जागा, अपुरा सूर्यप्रकाश आणि वेळेअभावी झाडे लावण्याचा विचार अनेकदा मागे पडतो.
मात्र काही अशी इनडोअर झाडे (Indoor Plants) आहेत, जी कमी प्रकाशात आणि कमी देखभालीतही चांगलं वाढतात. फ्लॅट, अपार्टमेंट किंवा छोट्या घरांसाठी ही झाले उत्तम पर्याय ठरू शकतात. ही झाडे केवळ घराची शोभा वाढवत नाहीत, तर घरातील वातावरण अधिक प्रसन्न बनवण्यासही मदत करतात.
हेही वाचा: ‘रामायण’चा ट्रेलर आज नाही होणार रिलीज; जाणून घ्या पुढे ढकलण्यामागचं नेमकं कारण
मनी प्लांट
मनी प्लांट हे जवळपास प्रत्येक घरात आढळणारे लोकप्रिय इनडोअर झाड आहे. हे झाड मातीमध्ये तसेच पाण्यातही वाढवता येते.
लिव्हिंग रूम, खिडकीजवळ किंवा बाल्कनीमध्ये ठेवलेले मनी प्लांट घराला आकर्षक बनवते. त्याच्या हिरव्यागार वेलीमुळे घरातील वातावरण अधिक सुंदर दिसते.
स्नेक प्लांट
स्नेक प्लांट हे घरासाठी सर्वात लोकप्रिय आणि सहज वाढणाऱ्या झाडांपैकी एक आहे. या झाडाला जास्त पाण्याची गरज नसते आणि कमी प्रकाशातही ते चांगले टिकते.
बेडरूम, हॉल किंवा ऑफिसच्या कोपऱ्यात ठेवण्यासाठी हे रोप योग्य आहे. कमी देखभाल करूनही हे झाड बराच काळ हिरवे राहते.
झेडझेड प्लांट
झेडझेड प्लांट आपल्या चमकदार हिरव्या पानांमुळे घराला आकर्षक आणि प्रीमियम लुक देते. हे झाड कमी प्रकाशातही वाढू शकते आणि त्याला वारंवार पाणी देण्याची गरज नसते.
या झाडाच्या मुळांमध्ये पाणी साठवण्याची क्षमता असल्याने जास्त पाणी देणे टाळावे. माती कोरडी झाल्यानंतरच पाणी देणे योग्य ठरते.
स्पायडर प्लांट
स्पायडर प्लांट आपल्या आकर्षक पानांमुळे घराच्या सजावटीसाठी उत्तम पर्याय मानले जाते. याची लांब, नाजूक पाने आणि खाली लटकणारी छोटी रोपे घराला वेगळा लुक देतात.
हे झाड थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवणे चांगले. कमी प्रकाश असलेल्या ठिकाणीही ते सहज वाढू शकते.
घरासाठी योग्य इनडोअर झाडांची निवड
फ्लॅटमध्ये झाडे लावताना घरातील प्रकाश, जागा आणि तुमच्याकडे असलेला वेळ लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. कमी देखभालीची ही झाडे घराला हिरवाई देण्यासोबतच सजावटीतही भर घालतात.



