Sanjay Raut on Minister Security : देशभरात विशेषत: दिल्ली ते मुंबई आणि महाराष्ट्राच्या विविध भागांत नीट परीक्षा घोटाळा आणि पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा प्रचंड भडका उडालाय…दिल्लीतील जंतर-मंतरवरील या ऐतिहासिक विद्यार्थी आंदोलनाची धग आता थेट महाराष्ट्रात आणि मुंबईतील शिवाजी पार्कपर्यंत पोहोचली होती… या वाढत्या तरुणांच्या संतापाचा मोठा धसका राज्य सरकारने घेतला आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व मंत्री, आमदार आणि खासदारांच्या सुरक्षेत अचानक मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला.. या सुरक्षा वाढीवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना खोचक टोला लगावलाय… टोमण्यांवर टोमणे मारत राऊतांनी पार अब्रुच काढलीय… राऊतांनी सरकारवर कसा निशाणा साधलाय ?
मंत्र्यांच्या सुरक्षेवर संजय राऊतांचा घणाघात; फडणवीस सरकारवर टीका
संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत फडणवीसांच्या सुरक्षा वाढवण्याच्या निर्णयाचा खरपूस समाचार घेतलाय… गृहमंत्र्यांनी पहिल्यांदाच आपल्या कार्यकाळात असा “दूरदृष्टीचा” आणि विलक्षण निर्णय घेतला आहे, असा खोचक टोला त्यांनी लगावला. बाहेर सध्या तरुण पिढीचं म्हणजेच ‘जनरेशन झेड’चं भयंकर वादळ घोंघावत असून या आंदोलकांच्या वादळाची सत्ताधाऱ्यांना इतकी प्रचंड भीती वाटत आहे की, त्यांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पोलिसांच्या सुरक्षेचा वेढा वाढवावा लागत आहे, असे राऊत मिश्कीलपणे म्हणाले. महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे राजकीय वातावरण बिघडलं असून ते पूर्णपणे सरकारविरोधी झाले आहे. जनतेशी गद्दारी करणाऱ्या या मंत्र्यांना आता पदोपदी स्वतःचा जीव जाण्याचा धोका वाटत आहे, अशी बोचरी टीका त्यांनी केली.
हेही वाचा : संजय शिरसाट अभिजीत दीपकेंच्या घरी; राजकारणात नवी चर्चा ?
Sanjay Raut on Minister Security :
Sanjay Raut : मंत्र्यांच्या सुरक्षेचा वेढा वाढवण्याच्या या निर्णयाची थट्टा उडवताना राऊत यांनी सत्ताधारी नेत्यांना थेट चक्क घरातच बसण्याचा सल्ला दिला. ज्या लोकप्रतिनिधींना आपल्याच राज्यातील तरुण मुला-मुलींची आणि सामान्य जनतेची एवढी दहशत वाटते, त्यांनी विनाकारण बाहेर फिरूच नये आणि सरळ घरात लपून बसावे, असे सांगत त्यांनी सरकारची नाचक्की केली. ठाण्यातील उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा उल्लेख करत राऊत म्हणाले की, आज देशाच्या पंतप्रधानांना किंवा केंद्रीय गृहमंत्र्यांना नसतो, त्यापेक्षा मोठा पोलिसांचा ताफा इथल्या मंत्र्यांच्या दिमतीला तैनात आहे. ही कसली लोकशाही आणि कसले हे लोकनेते, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. या चिघळलेल्या वातावरणात स्वतःचा जीव वाचवण्यासाठी फडणवीसांनी थेट केंद्र सरकारकडे लष्कर पाचारण करण्याचीच मागणी करावी, असा अत्यंत जहाल टोमणाही त्यांनी लगावला…
सुरक्षा वाढवण्यावरून महाराष्ट्रात नवा राजकीय वाद :
Sanjay Raut on Minister Security : दुसरीकडे, दिल्ली ते मुंबई पसरलेल्या आंदोलनात निष्पाप विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून होणाऱ्या दडपशाहीवरही त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. दिल्लीत राहुल गांधी, आदित्य ठाकरे आणि विरोधकांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.. दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेला लाठीमार आणि मुंबईत हक्क मागणाऱ्या तरुणांना पोलिसांकडून मिळालेल्या धमक्या यावरून राऊतांनी सरकारला धारेवर धरलं… परीक्षा घोटाळे करणाऱ्यांना पाठीशी घालून सरकार हक्कासाठी लढणाऱ्या देशाच्या भविष्याला गुन्हेगार ठरवत आहे, असा थेट आरोप त्यांनी केला. मंत्र्यांची सुरक्षा वाढवून जनतेचा आवाज दाबता येणार नाही, उलट यामुळे सरकारची नाचक्की आणि भ्याडपणा संपूर्ण देशासमोर उघडा पडला आहे, अशा शब्दांत संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी फडणवीस सरकारची संपूर्ण अब्रू काढली आहे…
मंत्र्यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय का घेण्यात आला?
NEET Protest : एकंदरीत पाहता, दिल्लीपासून मुंबईपर्यंत पेटलेला विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा हा भडका केवळ एका परीक्षेपुरता मर्यादित नसून, तो तरुण पिढीच्या व्यवस्थेविरुद्धच्या तीव्र असंतोषाचा सामूहिक उद्रेक आहे. अशा संवेदनशील परिस्थितीत आंदोलकांशी संवाद साधून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी, मंत्र्यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेणे म्हणजे सरकारने स्वतःच स्वतःभोवती भीतीचे कुंपण घालण्यासारखे आहे. संजय राऊत यांनी आपल्या खोचक टोमण्यांद्वारे नेमके याच मुद्द्यावर बोट ठेवून सरकारचा हा लोकशाहीविरोधी चेहरा आणि भ्याडपणा जनतेच्या दरबारात उघडा पाडला आहे. लोकशाहीत जनतेचा आणि विद्यार्थ्यांचा विश्वास गमावलेले सरकार केवळ पोलिसांच्या बंदुका आणि सुरक्षेच्या वेढ्यात स्वतःला कधीच सुरक्षित ठेवू शकत नाही, हाच या संपूर्ण वादाचा मुख्य निष्कर्ष आहे…








