• Home
  • महाराष्ट्र
  • यवतमाळमध्ये कार पुरात वाहून गेली! पत्नी आणि दोन चिमुकलींचा मृत्यू
Top News

यवतमाळमध्ये कार पुरात वाहून गेली! पत्नी आणि दोन चिमुकलींचा मृत्यू

Yavatmal Car Accident

Yavatmal Car Accident : पाऊस बरसला तर कुणासाठी हा आनंदाचा क्षण असतो तर कुणासाठी दु:खाचा…पाऊस पडल्यानंतर अनेक जण कुठंतरी फिरायला जाण्याचा प्लॅन बनवतात..तर काही जणांना वाटते की हा पाऊस असाच बरसत राहावं…पाऊस बरसत राहिला तर मस्त चहा पिऊ, मजा करू असं अनेकांना वाटतं..तर ज्यांंचं पोट हातावर असतं..जे रोज काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात, त्यांना वाटतं की गरजे पुरतंच पाऊस पडावं आणि आता तरी पाऊस बंद व्हावं…आता याच पावसाने यवतमाळमध्ये ( Yavatmal ) एका व्यक्तीकडून त्याचं जीवन हिसकावलं आहे..पुराच्या पाण्यात पत्नी आणि दोन चिमुकलींचा मृत्यू झालाय… यवतमाळमध्ये नेमकं काय घडलंय? पावसाने अख्ख्या कुटुंबाला कसं संपवलंय? निसर्गाचा कोप गेल्या काही दिवसांपासून का वाढलं आहे?

हेही वाचा :खडकवासला धरण पूर्ण भरलं! विसर्ग का वाढवला? कोणाला धोका?

यवतमाळमध्ये कार पुरात वाहून गेली! पत्नी आणि दोन चिमुकलींचा मृत्यू ( Yavatmal Car Accident )

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत आहे…संततधार सुरू असलेल्या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे…पावसामुळे दारवा तालुक्यातील दहेली येथील कूट्टी नदीला देखील मोठा पूर आला आहे…याच पुलावरून अविनाश खंदारे हे आपल्या पत्नीसह आणि दोन चिमुकलींना घेऊन रात्री 12.30 च्या सुमारास दारव्हा ते आर्णी येथील कूट्टी नदीच्या पुलावरून जात होते…पण नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी सुरू होतं..पुलावरून जात असतानाचा अचानक पुराचं पाणी वाढलं…अविनाश यांना पुलावरील पाण्याचा अंदाज आला नाही…त्यांनी पुलावरून कार नेत असतानाच कार थेट पाण्यात कोसळली आणि कार वाहून गेली…कारमध्ये चारही जण अडकले आणि कार पुराच्या पाण्यात वाहून जाऊ लागली..काही अंतराने कारमधून अविनाश खंदारे हे बाहेर पडल्याची माहिती आहे…काही अंतरावर गेल्यावर अविनाश खंडारे हे एका झाडाला अडकले…बचाव पथकाकडून शोध मोहिम राबवत अविनाश यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले… त्यानंतर आज सकाळी बचाव कार्यपथकाकडून शोध सुरू असताना त्यांच्या दोन चिमुकलीचा आणि त्यांच्या पत्नीचा मृतदेह आढळून आला आहे…त्यामुळे अविनाश यांनी एकच आक्रोश केला..

बचाव पथकाने काय सांगितले?

पुलावरून कार वाहून गेल्याने अपघात घडल्याचे जरी म्हटले जात असले, तरी गावकऱ्यांनी वेगळाच दावा केला आहे..या पुलाजवळ मोठं मोठे खड्डे पडलेले आहेत..या ठिकाणी काही अपघात देखील घडले आहेत..जर वेळीच काम केले असते तर ही दुर्घटना घडली नसती असं ग्रामस्थांनी म्हटलं आहे…

एका क्षणात अविनाश याचंं अख्खं कुटुंब संपल्याने जिल्हाभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे…अविनाश यांच्या पत्नी शिक्षिका होत्या, अशी माहिती आहे…पुराने एका हसत्या खेळत्या कुटुंबाला उद्ध्वस्त केलं आहे..राज्यातील काही जिल्ह्यात पावसाने असाच धुमाकूळ घातलाय…पुरामुळे शेतीचं, घराचं मोठं नुकसान झालं आहे…नांदेडच्या किनवटमध्ये देखील मुसळधार पावसाने हाहाकार माजवलाय…एका गरीब महिलेच्या घरात पुराचं पाणी घुसून सर्व संसारपयोगी वस्तू वाहून गेल्या आहेत..त्यामुळे महिलेने एकच हंबरडा फोडला आहे…

राज्यातील अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून पाऊस हजेरी लावताना दिसत आहे…काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने नुकसान होताना दिसत आहे…नागरिकांकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे..

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts