Friendship Day 2026: यंदा ‘फ्रेंडशिप डे’ २ ऑगस्ट २०२६ रोजी साजरा होणार आहे. या मैत्रीच्या खास दिवशी आपल्या मित्रमैत्रिणींना WhatsApp वर शेअर करा प्रेम, आठवणी आणि आपुलकीने भरलेले सुंदर मराठी शुभेच्छा संदेश.
आपल्या आयुष्यात अनेक नाती येतात आणि जातात, पण मैत्रीचं नातं हे नेहमीच खास असतं. आनंदाच्या क्षणी हसणारे आणि अडचणीच्या काळात खंबीरपणे साथ देणारे मित्र म्हणजे आयुष्याची खरी संपत्ती असते. अशाच खास मित्रांप्रती प्रेम, कृतज्ञता आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे (Friendship Day) साजरा केला जातो. (Friendship Day 2026)
हेही वाचा: तुम्हीही फ्रिजमध्ये हे पदार्थ ठेवता का? थांबा! यामुळे चव आणि गुणवत्ता होऊ शकते खराब
यंदा रविवार, २ ऑगस्ट २०२६ रोजी मैत्रीचा हा खास दिवस साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने तुमच्या जिवलग मित्रांना, मैत्रिणींना किंवा कुटुंबातील मित्रासारख्या व्यक्तींना खास शुभेच्छा पाठवून त्यांना तुमच्या आयुष्यातील त्यांचे महत्त्व सांगा.
मैत्री हे असे नाते आहे ज्यासाठी कोणत्याही कराराची गरज नसते. विश्वास, प्रेम आणि साथ या तीन गोष्टींवर हे सुंदर नाते कायम टिकून राहते. तुमच्या खास मित्रांसाठी काही मनापासून शुभेच्छा संदेश…
१.
नात्यांना नावं अनेक असतात,
पण मनापासून जोडलेलं मैत्रीचं नातं सर्वात सुंदर असतं.
आपली मैत्री अशीच कायम राहो!
मैत्री दिनाच्या शुभेच्छा!
२.
खरा मित्र तोच,
जो तुमच्या यशात आनंदी होतो आणि अपयशात धीर देतो.
अशा प्रत्येक मित्राला मैत्री दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
३.
नात्यांना नावं अनेक असतात,
पण मनापासून जोडलेलं मैत्रीचं नातं सर्वात सुंदर असतं.
आपली मैत्री अशीच कायम राहो!
मैत्री दिनाच्या शुभेच्छा!
४.
तुझ्यासोबतच्या आठवणी म्हणजे आयुष्यभर जपून ठेवावा असा खजिना आहे.
हसत-खेळत आणि कायम सोबत राहणाऱ्या या मैत्रीला मनापासून शुभेच्छा!
Happy Friendship Day!
५.
सुखात आनंद वाटून घेणारा आणि दुःखात आधार देणारा मित्र असणं ही आयुष्यातली मोठी कमाई आहे.
माझ्या खास मित्राला मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!









