• Home
  • महाराष्ट्र
  • 21 वर्षांच्या नात्यानंतर फसवणुकीचा आरोप; पुणे ZP मध्ये राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
राजकारण

21 वर्षांच्या नात्यानंतर फसवणुकीचा आरोप; पुणे ZP मध्ये राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

Pune ZP incident

Pune Zilla Parishad: पुणे जिल्हा परिषदेत (Pune Zilla Parishad) बारामतीतील राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याच्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे खळबळ उडाली आहे. मंगेश जगताप यांच्यावर 21 वर्षे लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामागची नेमकी कहाणी काय आहे?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती युवती आघाडीच्या अध्यक्षा भाग्यश्री धायगुडे यांनी जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्याविरोधात लग्नाचे आश्वासन देऊन वर्षे फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणादरम्यान पुणे जिल्हा परिषदेत त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली. मात्र, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेळेवर हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.

या प्रकरणातील सर्व आरोप संबंधित तरुणीने केले असून, त्याबाबत अधिकृत चौकशी सुरू आहे. मंगेश जगताप यांची भूमिका अद्याप सार्वजनिकरीत्या समोर आलेली नाही.

हेही वाचा: BoB खातेदारांनी त्वरित करा ‘ही’ 5 कामे, नाहीतर होऊ शकते फसवणूक

नेमके काय घडले?

पुणे जिल्हा परिषदेच्या (Pune Zilla Parishad) सभेदरम्यान भाग्यश्री धायगुडे अचानक सभागृहात पोहोचल्या. आणि त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित पोलीस आणि सुरक्षारक्षकांनी तातडीने हस्तक्षेप करून त्यांना रोखले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेनंतर मंगेश जगताप जिल्हा परिषद परिसरातून निघून गेल्याचे सांगितले जाते.

तरुणीचे आरोप काय?

भाग्यश्री धायगुडे (Bhagyashree Dhaygude) यांनी दावा केला की, मंगेश जगताप (Mangesh Jagtap) यांनी 21 वर्षे लग्नाचे आश्वासन देत आपली फसवणूक केली. डिव्होर्स घेतोय म्हणून खोटे कागदपत्र दाखवले. मंगेश जगताप यांचे कुटुंब त्यांची मेहुणी पोलीस आहे. आणि त्याचे दोन मित्र अमर अशोक जगताप या सर्वाना या प्रकरणाची माहिती आहे.  गेल्या तीन महिन्यांपासून ते आपल्याशी संपर्क टाळत असल्याचाही दावा त्यांनी केला.

खोट्या कागदपत्रांचाही आरोप

भाग्यश्री धायगुडे ((Bhagyashree Dhaygude)) यांच्या म्हणण्यानुसार, दोघांची ओळख महाविद्यालयीन काळापासून होती. नंतर मंगेश जगताप यांनी आपण घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत काही कागदपत्रे दाखवली होती. मात्र, नंतर ती कागदपत्रे खोटी असल्याचे समोर आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

चौकशीकडे लक्ष

या प्रकरणामुळे राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठी चर्चा सुरू आहे. संबंधित तरुणीच्या तक्रारीनंतर याप्रकरणाची चौकशी सुरू असून, अधिकृत तपासानंतरच संपूर्ण सत्य स्पष्ट होणार आहे. संबंधित सर्व पक्षांची भूमिका समोर आल्यानंतर पुढील चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts