Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • शेतकऱ्यांनो लक्ष द्या! पंतप्रधान पीक विमा योजनेचा अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस; असा करा ऑनलाइन अर्ज
ऍग्रो स्पेशल

शेतकऱ्यांनो लक्ष द्या! पंतप्रधान पीक विमा योजनेचा अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस; असा करा ऑनलाइन अर्ज

PM Fasal Bima Yojana 2026
PM Fasal Bima Yojana 2026: शेतकऱ्यांनो, अजूनही पंतप्रधान पीक विमा योजनेचा अर्ज भरला नसेल तर आजच अर्ज करून घ्या. अर्ज भरण्याची आज अंतिम मुदत आहे, त्यामुळे शेवटच्या संधीचा लाभ घ्या.

पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीत हंगामातील पिकांचा विमा उतरवण्याची अर्ज करण्याचा अर्ज शेवटचा दिवस (PMFBY Last Date) आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पीक विमा काढलेला नाही, त्यांनी मुदतीपूर्वी अर्ज भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पंतप्रधान पीक विमा योजनेला (PM Fasal Bima Yojana 2026) यंदा राज्यातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत असला, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत सहभागी शेतकऱ्यांची संख्या कमी झाल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत ७३ लाख ७७ हजार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवला आहे. या शेतकऱ्यांनी तब्बल ४७ लाख ४० हजार ८२१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरवला आहे.

हेही वाचा: बुलढाण्याला मिळणार ‘राजमाता जिजाऊनगर’ नाव? श्वेता महालेंच्या मागणीनंतर फडणवीसांचे निर्देश

मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पंतप्रधान पीक विमा योजनेत (PM Fasal Bima Yojana 2026) सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सुमारे २० लाखांनी घटली आहे. त्यामुळे उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी आजची अंतिम मुदत लक्षात घेऊन पीक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पीक विमा योजनेचा लाभ काय? (PM Fasal Bima Yojana 2026)

नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, दुष्काळ, वादळी वारे किंवा इतर प्रतिकूल हवामानामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे, हा पीक विमा योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

ऑनलाइन अर्ज कसा कराल? (PMFBY Online Apply)

पंतप्रधान पीक विमा योजनेचा (PM Fasal Bima Yojana 2026) अर्ज शेतकरी ऑनलाइन पद्धतीने भरू शकतात. त्यासाठी अधिकृत पीक विमा पोर्टल pmfby.gov.in वर जाऊन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी. अर्ज करताना शेतकऱ्यांनी आधार क्रमांक, बँक खाते तपशील, जमिनीची माहिती आणि पिकांची आवश्यक माहिती उपलब्ध ठेवावी.

अर्ज भरल्यानंतर दिलेली माहिती योग्य आहे का, याची खात्री करून अर्ज सबमिट करावा. अर्जाची पावती किंवा संदर्भ क्रमांक जतन करून ठेवणेही महत्त्वाचे आहे.

दरम्यान, आज अर्ज भरण्याची अंतिम मुदत असल्याने पात्र शेतकऱ्यांनी (Maharashtra Farmers) ही संधी दवडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अंतिम मुदतीनंतर अर्ज स्वीकारला जाणार नसल्याने शेतकऱ्यांनी शक्य तितक्या लवकर पीक विमा अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts