Breaking News :
  • Home
  • Top News
  • तुरुंगातच इम्रान खान यांचा मृत्यू? पाकिस्तानी पत्रकाराच्या दाव्याने वाढलं गूढ
देश

तुरुंगातच इम्रान खान यांचा मृत्यू? पाकिस्तानी पत्रकाराच्या दाव्याने वाढलं गूढ

Imran Khan
51

Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रकृती आणि ठावठिकाणाबाबत पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. ज्येष्ठ पाकिस्तानी पत्रकार वाजहत एस. खान यांनी इम्रान खान तुरुंगात मरण पावल्याचा दावा केला आहे. मात्र, या दाव्याला पाकिस्तान सरकारकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

नेमका दावा काय?

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Former Pakistan PM) सध्या अदियाला तुरुंगात आहेत. त्यांच्याबाबत ज्येष्ठ पत्रकार वाजहत एस. खान यांनी गंभीर दावा केला असून, काही लष्करी सूत्रांचा हवाला देत इम्रान खान यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, या दाव्याची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.

हेही वाचा: वर्ग सुरू असतानाच शाळेच्या पोर्चचा स्लॅब कोसळला; १३ विद्यार्थी जखमी

भेटीगाठींवर निर्बंध असल्याचा दावा

इम्रान खान यांना कुटुंबीय आणि पक्षाच्या नेत्यांना भेटण्यास अडथळे निर्माण होत असल्याचे त्यांच्या पक्षाकडून यापूर्वीही सांगण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यांच्या आरोग्याबाबत पारदर्शक माहिती सार्वजनिक करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

इम्रान खान यांच्या आरोग्याबाबत यापूर्वीही चिंता व्यक्त करण्यात आली होती. विशेषतः त्यांच्या डोळ्यांच्या समस्येबाबत त्यांच्या पक्षाकडून माहिती देण्यात आली होती. त्यामुळे सध्याच्या दाव्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

PTI कडूनही चिंता व्यक्त

इम्रान खान यांच्या पक्षाने म्हणजेच पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफने त्यांच्या प्रकृतीबाबत समोर येणाऱ्या अहवालांवर चिंता व्यक्त केली आहे. पक्षाकडून इम्रान खान यांच्याशी संपर्क आणि त्यांच्या आरोग्याची खात्री करण्याची मागणी केली जात आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चेला वेग

इम्रान खान यांना न्यायालयीन प्रक्रिया आणि वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, तसेच कुटुंबीयांना त्यांची भेट घेता यावी, या मागण्यांसाठी PTIकडून आंदोलनाची तयारी सुरू असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूच्या दाव्यामुळे पाकिस्तानातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts