Breaking News :
  • Home
  • देश
  • 2027 च्या जनगणनेची प्रश्नावली समोर; नागरिकांकडून घेतली जाणार ‘ही’ महत्त्वाची माहिती
देश

2027 च्या जनगणनेची प्रश्नावली समोर; नागरिकांकडून घेतली जाणार ‘ही’ महत्त्वाची माहिती

India Census 2027
64
India Census 2027 : २०२७ मध्ये होणाऱ्या जनगणनेसाठी केंद्र सरकारने ४० प्रश्नांची प्रश्नावली जाहीर केली आहे. यात जात- धर्मसह शिक्षण, रोजगार, स्थलांतर, कोविड लसीकरण, बँक खाती आणि ओळखपत्रांशी संबंधित माहिती घेतली जाणार आहे.

केंद्र सरकारने २०२७ मध्ये होणाऱ्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी जाहीर केली आहे. केंद्रीय गृह मंत्रायलयाने शुक्रवारी ४० प्रश्नांची प्रश्नावली प्रसिद्ध केली. या प्रश्नावलीमध्ये जात, धर्म, मुलांची संख्या, कोविड- १९ लसीकरण, बँक खाती आणि इतर वैयक्तिक माहितीशी संबंधित प्रश्नांचा समावेश आहे.

हेही वाचा: कुंभमेळ्याच्या नावाने 592 कोटींचा ‘खेळ’? मंत्री गिरीश महाजनांच्या नातेवाईकांना अटक; नेमकं प्रकरण काय?

या जनगणनेत कोणती माहिती विचारली जाणार?

एकूण ४० प्रश्न विचारले जाणार आहेत. यात व्यक्तीचे नाव, कुटुंबप्रमुखाशी असलेले नाते, लिंग, जन्मतारीख आणि वय, सध्याची वैवाहिक स्थिती, लग्नाच्या वेळीचे वय, जोडीदाराचे नाव आणि राष्ट्रीयत्व याबाबत माहिती घेतली जाणार आहे.

याशिवाय धर्म, वडिलांचे आणि आईचे नाव, दिव्यांगत्व, मातृभाषा तसेच इतर कोणत्या भाषा येतात, साक्षरता आणि डिजिटल साक्षरतेची स्थिती, शिक्षण संस्थेत उपस्थिती, व्यक्तीने घेतलेले सर्वोच्च शिक्षण आणि त्यातील शाखा किंवा विषय याबाबतही प्रश्न असतील. LS Marathi News Channel

रोजगार आणि स्थलांतराचीही माहिती

व्यक्तीने मागील वर्षभरात कधी काम केले आहे का, यासह सीमांत आणि अर्ध-सीमांत कामगार तसेच गैर-कामगार व्यक्तींच्या कामाशी संबंधित माहिती घेतली जाणार आहे.

कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी वापरले जाणारे वाहतुकीचे साधन, जन्मस्थान, यापूर्वीचे वास्तव्याचे ठिकाण आणि दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्याचे कारण याबाबतही प्रश्न असतील. तसेच दुसऱ्या ठिकाणाहून सध्याच्या गावात किंवा शहरात आल्यानंतर किती काळ झाला, याचीही नोंद केली जाणार आहे.

वैयक्तिक आणि डिजिटल माहितीवरही भर

जनगणनेच्या प्रश्नावलीत कायमस्वरूपी घराचा पत्ता, सध्या जिवंत असलेल्या मुलांची संख्या याबाबतही माहिती मागितली जाणार आहे. मुलांची संख्या हा प्रश्न सध्या विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा विभक्त राहणाऱ्या महिलांसाठी लागू असेल.

याशिवाय कोविड- १९ लस कुठे घेतली, व्यक्तीच्या नावावर एकूण किती बँक खाती आहेत, मोबाईल नंबर, आधार क्रमांक आणि मतदार ओळखपत्र क्रमांक याबाबतही माहिती विचारली जाऊ शकते.

भारतीय पासपोर्ट असल्यास पासपोर्ट क्रमांक आणि ड्रायव्हिंग लायसन्स उपलब्ध आहे की नाही, याचाही प्रश्नावलीत समावेश करण्यात आला आहे.

या प्रश्नावलीमुळे आगामी जनगणनेत नागरिकांची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, रोजगार, स्थलांतर आणि काही डिजिटल-संबंधित माहिती अधिक व्यापक स्वरूपात संकलित केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts