Breaking News :
  • Home
  • Top News
  • रक्षाबंधनाच्या आधी करा 5 स्टेप्समध्ये होम फेशियल; चेहरा दिसेल फ्रेश आणि ग्लोइंग
लाईफस्टाईल

रक्षाबंधनाच्या आधी करा 5 स्टेप्समध्ये होम फेशियल; चेहरा दिसेल फ्रेश आणि ग्लोइंग

Raksha Bandhan 2026
11
Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक बहिणीला सुंदर आणि ग्लोइंग दिसावंसं वाटतं. यासाठी तुम्ही महागड्या पार्लरमध्ये फेशियल करण्याचा विचार करत असाल, तर थांबा! फक्त ५ सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही घरच्या घरी फेशियल करू शकता आणि चेहरा फ्रेश व ग्लोइंग दिसण्यास मदत होऊ शकते. हे फेशियल नेमकं कसं करायचं? चला तर जाणून घेऊया.

रक्षाबंधनाचा सण प्रत्येक भावा- बहिणीसाठी खास असतो. या दिवशी बहिणाला सुंदर दिसण्यासाठी नवीन कपडे, दागिने आणि मेकअपसोबत त्वचेचीही थोडी खास काळजी घेतली तर तुमचा लूक आणखी खुऊन दिसू शकतो. फेशियलसाठी पार्लरमध्ये जाणे आणि त्यासाठी वेळ व पैसे खर्च करणे प्रत्येकाला शक्य असेलच असे नाही. अशावेळी घरच्या घरी (home facial for glowing skin) करता येणारे सोपे फेशियल रूटीन तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकते. फक्त ५ सोप्या स्टेप्सच्या मदतीने तुम्ही त्वचा स्वच्छ करून तिला फ्रेश लुक देऊ शकता. विशेष म्हणजे, या स्टेप्स करण्यासाठी महागड्या प्रोडक्ट्सची गरज नाही. चला तर मग, रक्षाबंधनाआधी (Raksha Bandhan facial) हे सोपे होम फेशियल कसे करायचे ते जाणून घेऊया.

चेहरा क्लिंझ करा

सर्वप्रथम चेहऱ्यावरील मेकअप, धूळ आणि अतिरिक्त तेल काढून टाका. यासाठी तुमच्या त्वचेच्या प्रकाराला अनुरूप सौम्य फेसवॉश वापरा. चेहरा स्वच्छ केल्यानंतर मऊ टॉवेलने हलक्या हाताने कोरडा करा.

हेही वाचा: श्रावणातील उपवासासाठी परफेक्ट! फक्त १० मिनिटांत बनवा कुरकुरीत साबुदाणा-राजगिरा चीला

हलकी वाफ आणि सौम्य एक्सफोलिएशन करा

गरम पाण्याची वाफ काही मिनिटे घ्या. यानंतर त्वचेवरील डेड स्किन काढण्यासाठी सौम्य एक्सफोलिएटर वापरा. बोटांच्या टोकांनी अगदी हलक्या हाताने काही वेळ मसाज करा आणि नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. तसेच त्वचा संवेदनशील असेल, मुरुम किंवा लालसरपणा असेल तर स्क्रबिंग टाळणे चांगले.

फेस मसाज करा

आता चेहऱ्यावर हलका मॉइश्चरायझर किंवा त्वचेला योग्य असा फेस जेल लावून काही मिनिटे मसाज करा. चेहऱ्यावर जास्त दाब न देता वरच्या दिशेने हलक्या हाताने मसाज करा. यामुळे स्किन केअर रूटीन अधिक रिलॅक्सिंग वाटू शकते. ( LS Marathi News Channel )

फेस पॅक लावा

त्वचेच्या प्रकारानुसार योग्य फेस पॅक निवडा. घरगुती पर्याय हवा असल्यास बेसन आणि दही यांचे साधे मिश्रण वापरू शकता. हे मिश्रण चेहरा आणि मानेला पातळ थराने लावा. डोळे आणि ओठांचा भाग टाळा. फेस पॅक पूर्णपणे कोरडा होण्याची वाट न पाहता साध्या पाण्याने हलक्या हाताने स्वच्छ करा.

मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन ( moisturizer for glowing skin)

शेवटी चेहरा स्वच्छ केल्यानंतर त्वचेला योग्य मॉइश्चरायझर लावा. दिवसा बाहेर जाणार असाल तर सनस्क्रीन लावणेही महत्त्वाचे आहे. यामुळे त्वचेचा ओलावा टिकवण्यास आणि उन्हापासून संरक्षण मिळण्यास मदत होते.

रक्षाबंधनाच्या दिवशी चेहरा फ्रेश दिसण्यासाठी छोट्या टिप्स

रक्षाबंधनाच्या दिवशी मेकअप करण्यापूर्वी त्वचेला पुरेसा मॉइश्चरायझर लावा. दिवसभर पुरेसे पाणी प्या आणि शक्य असल्यास आदल्या रात्री चांगली झोप घ्या. नवीन स्किन केअर प्रोडक्ट किंवा घरगुती घटक पहिल्यांदाच वापरत असाल, तर आधी छोट्या भागावर पॅच टेस्ट करणे योग्य ठरेल.

महत्त्वाचे: घरगुती फेशियलमुळे (home facial for glowing skin) प्रत्येकाच्या त्वचेवर सारखाच परिणाम होईलच असे नाही. त्वचा संवेदनशील असल्यास किंवा त्वचेची कोणतीही समस्या असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच नवीन उपाय करून पाहा.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts