Breaking News :
  • Home
  • Top News
  • मोठी बातमी! अवघ्या काही तासांच्या जिवंत नवजात बालिकेला उघड्यावर टाकले; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
गुन्हा

मोठी बातमी! अवघ्या काही तासांच्या जिवंत नवजात बालिकेला उघड्यावर टाकले; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

Soygaon Newborn Baby Abandoned
38
Soygaon Newborn Baby Abandoned: सोयगाव तालुक्यातील जंगला तांडा येथे अवघ्या काही तासांच्या नवजात बालिकेला उघड्यावर सोडून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सोयगाव तालुक्यातील जंगला तांडा परिसरात अवघ्या काही तासांच्या नवजात बालिकेला उघड्यावर बेवारस अवस्थेत सोडून दिल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी समोर आली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नवजात बालिकेला अशा अवस्थेत सोडून जाणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास जंगला तांडा शिवारात नवजात बालिका बेवारस अवस्थेत आढळून आली. अज्ञात व्यक्तीने बालिकेला उघड्यावर सोडून तेथून निघून गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा: श्रावणातील उपवासासाठी परफेक्ट! फक्त १० मिनिटांत बनवा कुरकुरीत साबुदाणा-राजगिरा चीला

पोलिस पाटलांनी दिली माहिती

बालिका उघड्यावर असल्याचे लक्षात आल्यानंतर जंगला तांड्याच्या पोलिस पाटील संगीताबाई गोरख राठोड यांनी तातडीने फर्दापूर पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस पथकाने घटनास्थळी पोहोचून बालिकेला सुरक्षित ताब्यात घेतले.

त्यानंतर नवजात बालिकेला पुढील वैद्यकीय तपासणी आणि उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची वैद्यकीय काळजी घेतली जात असल्याची माहिती आहे.

अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलिस पाटील संगीताबाई राठोड यांच्या फिर्यादीवरून फर्दापूर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालिकेला कोणी आणि कोणत्या कारणामुळे उघड्यावर सोडले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

परिसरातील उपलब्ध माहितीच्या आधारे संबंधित व्यक्तीचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू असून, या घटनेमागील नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

नवजात बालिकेला अशा प्रकारे उघड्यावर सोडल्याच्या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. काही तासांच्या बाळाला बेवारस अवस्थेत सोडून जाणाऱ्या व्यक्तीचा लवकरात लवकर शोध घेऊन कारवाई करावी, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts