Breaking News :
  • Home
  • संस्कृती
  • दुसरा श्रावण सोमवार ठरणार खास! ‘या’ 7 राशींवर बरसेल भोलेनाथांची कृपादृष्टी? जाणून घ्या आजचं राशीभविष्य
राशी भविष्य

दुसरा श्रावण सोमवार ठरणार खास! ‘या’ 7 राशींवर बरसेल भोलेनाथांची कृपादृष्टी? जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Shravan Somwar Horoscope 2026
4
Shravan Somwar Horoscope 2026: आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे. हा दिवस अत्यंत विशेष मानला जातो. ग्रह- नक्षत्रांच्या स्थितीमुळे ७ राशींसाठी आजचा दिवस शुभ ठरू शकतो. नोकरी, व्यवसाय, पैसा आणि नातेसंबंधांमध्ये काय घडणार? जाणून घ्या आजचं राशिभविष्य.

आज सोमवार, २४ ऑगस्ट २०२६. श्रावण महिन्यातील सोमवार (Shravan Somwar) असल्याने शिवभक्तांसाठी आजचा दिवस विशेष मानला जातो. भगवान शंकराची आराधना आणि सकारात्मक विचारांसह दिवसाची सुरुवात केल्यास मानला शांतता मिळू शकते. आज ग्रह- नक्षत्रांच्या स्थितीचा प्रत्येक राशीवर वेगवेगळा परिणाम होण्याची शक्यता आहे. काही राशींना कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात, तर काहींना आर्थिक व्यवहार आणि नातेसंबंधांमध्ये सावध राहावे लागू शकते. तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या १२ राशींचे (12 Zodiac Signs) आजचे राशिभविष्य (Shravan Somwar and Zodiac Predictions)

हेही वाचा: एकच आक्रोश… अमरावतीच्या NICU मध्ये भीषण आग; 3 नवजात चिमुकल्यांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

मेष राशी (Aries Horoscope Today)

आज कामाचा ताण वाढला तरी नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास अनेक अडचणी सहज दूर होतील. अनावश्यक घाई टाळा. घरातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि विश्रांतीसाठी वेळ काढा.

वृषभ राशी (Taurus Horoscope Today)

आज एखाद्या निर्णयासाठी इतरांचे मत घेणे फायदेशीर ठरू शकते. आर्थिक बाबतीत व्यवहार करताना प्रत्येक गोष्ट तपासून घ्या. तुमच्या सर्जनशील विचारांना आज चांगला वाव मिळेल. एखादी नवीन कल्पना कौतुकास पात्र ठरू शकते.

मिथुन राशी (Gemini Horoscope Today)

आज हाताशी आलेली संधी टिकवण्यासाठी संयम आणि योग्य निर्णय महत्त्वाचा ठरेल. कामात किरकोळ चुका होऊ शकतात, त्यामुळे महत्त्वाची कागदपत्रे पुन्हा तपासा. एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत गैरसमज निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या.

कर्क राशी (Cancer Horoscope Today)

आज काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये योग्य समतोल राखण्याची गरज आहे. सतत काम करत राहण्यापेक्षा वेळोवेळी विश्रांती घेतल्यास उत्साह कायम राहील. कुटुंबासोबत काही आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळू शकते.

सिंह राशी (Leo Horoscope Today)

आज ज्ञान आणि कौशल्य वाढवण्याच्या दृष्टीने चांगला दिवस आहे. एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास केल्यास भविष्यात त्याचा फायदा होईल. मित्र किंवा सहकाऱ्याला अडचणीच्या वेळी मदत केल्याने तुमचे नाते अधिक मजबूत होईल.

कन्या राशी (Virgo Horoscope Today)

नोकरी आणि व्यवसायात नवीन प्रयोग करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल ठरू शकतो. तुमच्या कल्पना वरिष्ठ किंवा सहकाऱ्यांना आवडण्याची शक्यता आहे. मात्र, कोणतीही योजना प्रत्यक्षात आणण्यापूर्वी तिचे नियोजन व्यवस्थित करा.

तूळ राशी (Libra Horoscope Today)

आज व्यावसायिक क्षेत्रात काही सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. व्यवहारातून फायदा मिळण्याची शक्यता आहे. महिलांना त्यांच्या बुद्धिमत्ता आणि कौशल्याच्या जोरावर एखादे नवीन काम हाती घेण्याची संधी मिळू शकते.

वृश्चिक राशी (Scorpio Horoscope Today)

कौटुंबिक वातावरणात आज भावना अधिक तीव्र होऊ शकतात. छोट्या मुद्द्यांवरून वाद वाढणार नाहीत याची काळजी घ्या. अनावश्यक खर्च टाळणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. जवळच्या व्यक्तीला आर्थिक मदत करण्यापूर्वी परिस्थितीचा विचार करा.

धनु राशी (Sagittarius Horoscope Today)

आज प्रत्येकाकडून अपेक्षा ठेवणे टाळा. एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने निराशा होऊ शकते. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. महत्त्वाची कामे इतरांवर अवलंबून न ठेवता स्वतः पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

मकर राशी (Capricorn Horoscope Today)

आज एखाद्या आकर्षक संधीच्या मागे धावताना हातातील महत्त्वाची गोष्ट गमावू नका. निर्णय घेताना वास्तव परिस्थितीचा विचार करा. वडिलांच्या किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक ठरू शकते.

कुंभ राशी (Aquarius Horoscope Today)

आज अचानक काही अतिरिक्त खर्च समोर येऊ शकतात. त्यामुळे आर्थिक नियोजन बिघडणार नाही याची काळजी घ्या. शेजारी किंवा आसपासच्या व्यक्तीच्या वागण्यामुळे मनस्ताप होऊ शकतो; मात्र वाद वाढवण्यापेक्षा शांत राहणे योग्य ठरेल.

मीन राशी (Pisces Horoscope Today)

आज मुलांच्या विचारांशी तुमचे मत जुळणार नाही, त्यामुळे संवाद साधताना संयम ठेवा. मन काहीसे अस्थिर आणि चंचल राहू शकते. महत्त्वाचे निर्णय भावनेच्या भरात न घेता शांतपणे विचार करून घ्या. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न होईल.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts