Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • मुंबईकरांना मोठा झटका! साखरेनंतर आता दूधाच्या दरात तब्बल 9 रुपयांची वाढ? जाणून घ्या नेमकं कारण
Mumbai

मुंबईकरांना मोठा झटका! साखरेनंतर आता दूधाच्या दरात तब्बल 9 रुपयांची वाढ? जाणून घ्या नेमकं कारण

Mumbai Milk Price Hike
7
Mumbai Milk Price Hike: साखरेनंतर आता म्हशीच्या दुधाच्या दरातही तब्बल 9 रुपयांची वाढ होणार असल्याची माहिती आहे. या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांच्या बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे. नवे दर कधीपासून लागू होणार आणि या दरवाढीमागचे नेमके कारण काय, जाणून घेऊया.

सणासुदीचा काळ जवळ येताच मुंबईकरांच्या घरखर्चावर आणखी ताण पडण्याची शक्यता आहे. साखरेच्या दरवाढीनंतर आता दूधही महाग (milk rate hike 2026)  होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दूध उत्पादकांच्या वाढत्या खर्चाचा (Mumbai milk price) विचार करता मुंबई दुग्ध उत्पादक संघाने घाऊक दूध दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या मुंबईत म्हशीच्या दूधाचा दर प्रतिलिटर 93 रुपये आहे. दरवाढीनंतर हा दर थेट 102 रुपये प्रति लिटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच दूधाच्या दरात तब्बल 9 रुपयांची वाढ होणार आहे.

हेही वाचा: नेपाळमध्ये महापुराचा कहर; मृतांचा आकडा 469 वर, 1,400 हुन अधिक जण बेपत्ता

ही दरवाढ 1 सप्टेंबर 2026 पासून लागू होऊन 28 फेब्रुवारी 2027 पर्यंत राहण्याची शक्यता (Mumbai milk rate September 2026) आहे. अशी माहिती मुंबई दुग्ध उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकुमार सिंग यांनी दिली. त्यामुळे गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी यांसारख्या सणांच्या काळातच ग्राहकांना महागाईचा अतिरिक्त भार सहन करावा लागू शकतो.

पशुखाद्य महागल्याने दूध उत्पादकांचा खर्च वाढला

दूधाच्या दरवाढीमागे पशुपालकांच्या वाढलेल्या उत्पादन खर्चाचे कारण देण्यात आले आहे. दुधाळ जनावरांच्या किमती वाढण्यासोबतच त्यांच्यासाठी लागणाऱ्या खाद्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. (Mumbai milk price latest news)

दाणा, तूरचुणी, चणाचुणी यांसारख्या पशुखाद्यांच्या किमतीत सुमारे 25 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. याशिवाय चारा आणि पेंड यांच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे दूध उत्पादनाचा खर्च वाढत असल्याने उत्पादकांवर आर्थिक दबाव निर्माण झाला आहे.

जोगेश्वरी येथील दिवाण सेंटर सभागृहात झालेल्या बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर घाऊक दूध दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

सणासुदीत घरगुती बजेटवर परिणाम

सणांच्या दिवसांत दूध हा रोजच्या वापरातील अत्यावश्यक पदार्थ आहे. चहा, कॉफी, मिठाई, खीर, श्रीखंड यांसह विविध पदार्थांसाठी दूध मोठ्या प्रमाणात वापरले जाते. त्यामुळे दूधाच्या दरात वाढ झाल्यास त्याचा थेट परिणाम सामान्य कुटुंबांच्या मासिक खर्चावर होऊ शकतो.

दूधासोबतच साखरेच्या दरातही वाढ होत असल्याने ग्राहकांसमोर दुहेरी महागाईचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात वाढणारा खर्च पाहता नागरिकांच्या बजेटचे गणित बिघडू शकते.

साखरेच्या साठवणुकीवरही निर्बंध

दरम्यान, साखरेच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा विभागाने व्यापाऱ्यांसाठी साखर साठवणुकीबाबत नियम जारी केले आहेत.

या नियमानुसार व्यापाऱ्यांना 30 दिवसांपेक्षा अधिक काळ साखरेचा साठा ठेवता येणार नाही. तसेच कोणत्याही ठिकाणी 4,000 क्विंटलपेक्षा जास्त साखर साठवण्यास मर्यादा घालण्यात आली आहे.

साखरेचा अनावश्यक साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये आणि बाजारातील दर नियंत्रणात राहावेत, या उद्देशाने हे निर्बंध लागू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

एकीकडे साखरेच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना सुरू असताना दुसरीकडे दूधाच्या दरवाढीची शक्यता निर्माण झाल्याने मुंबईकरांसाठी आगामी सणासुदीचा काळ महागाईच्या छायेत जाण्याची शक्यता आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts