• Home
  • ताज्या बातम्या
  • 8 हजारांपेक्षा कमी किंमतीत Lava चा नवा स्मार्टफोन; 5000mAh बॅटरीसह Bold N4 Lite लाँच, पाहा फीचर्स
विज्ञान- तंत्र

8 हजारांपेक्षा कमी किंमतीत Lava चा नवा स्मार्टफोन; 5000mAh बॅटरीसह Bold N4 Lite लाँच, पाहा फीचर्स

Lava Bold N4 Lite Launched
6
Lava Bold N4 Lite Launched: नवीन मोबाईल घेण्यासाठी तुमचं बजेट 8 हजार रुपयांपेक्षा कमी आहे का? मग Lava चा नवा स्मार्टफोन तुमच्यासाठी एक पर्याय ठरू शकतो. कंपनीने कमी किमतीत 5000mAh बॅटरी, मोठा डिस्प्ले आणि Android 16 Go Editionसह Bold N4 Lite लाँच केला आहे. या फोनमध्ये आणखी काय फीचर्स मिळतात आणि त्याची किंमत किती आहे? जाणून घेऊया.

कमी बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी भारतीय कंपनी लावाने आपला नवीन फोन बाजारात आणला आहे. कंपनीने Lava Bold N4 Lite हा एंट्री-लेव्हल स्मार्टफोन लाँच केला असून, कमी किमतीत मोठा डिस्प्ले, 5000mAh बॅटरी आणि 4G कनेक्टिव्हिटी यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. (Lava Bold N4 Lite price in India)

बाजारात बजेट सेगमेंटला मोठी मागणी

भारतीय स्मार्टफोन बाजारात बजेट सेगमेंटला मोठी मागणी आहे. हीच बाब लक्षात घेऊन लावाने Bold N4 Lite सादर केला आहे. विशेष म्हणजे, लाँच ऑफरमध्ये हा फोन 8 हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत खरेदी (Lava mobile under 8000) करता येणार आहे.

हेही वाचा: 19 वर्षांनंतर इमरान हाश्मीचा जलवा! ‘आवारापन 2’ने 15 दिवसांत किती कमावले? आकडा आले समोर

Lava Bold N4 Lite ची किंमत किती? (Lava Bold N4 Lite price in India)

Lava Bold N4 Lite ची अधिकृत किंमत 8,099 रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र सुरुवातीच्या ऑफरमध्ये ग्राहकांना हा स्मार्टफोन 7,999 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. (Lava smartphone price 2026)

फोनची ऑनलाइन विक्री 3 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. हा स्मार्टफोन Amazon India वर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लाँच ऑफर मर्यादित कालावधीसाठी असल्याने ऑफर संपल्यानंतर फोनची किंमत पुन्हा बदलू शकते.

मोठा 6.75 इंचाचा डिस्प्ले

Lava Bold N4 Lite मध्ये 6.75 इंचाचा HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्क्रीनचे रिझॉल्यूशन 720 × 1600 पिक्सेल आहे. मोठ्या स्क्रीनमुळे व्हिडीओ पाहणे, सोशल मीडिया वापरणे आणि दैनंदिन कामांसाठी फोन अधिक सोयीचा ठरू शकतो.

फोनच्या मजबुतीसाठी कंपनीने MIL-STD-810H मिलिटरी-ग्रेड ड्यूरेबिलिटी रेटिंग दिले आहे. रंगांच्या बाबतीत ग्राहकांना Empire Gold आणि Ghost Silver असे दोन पर्याय मिळतात.

Unisoc प्रोसेसरसह 3GB RAM

परफॉर्मन्ससाठी फोनमध्ये ऑक्टा-कोर 28nm Unisoc 9863A प्रोसेसर वापरण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी PowerVR GE8322 GPU देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनमध्ये 3GB फिजिकल RAM (Lava Bold N4 Lite 32GB storage) मिळते. यासोबत व्हर्च्युअल RAMच्या माध्यमातून RAM आणखी 3GB पर्यंत वाढवता येते. स्टोरेजसाठी 32GB इंटरनल मेमरी देण्यात आली असून, मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ती 64GB पर्यंत वाढवता येते. (Android 16 Go phone)

8MP कॅमेरा आणि 5MP सेल्फी कॅमेरा

फोटोग्राफीसाठी Lava Bold N4 Lite च्या मागील बाजूस 8MP सिंगल कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेऱ्यासोबत LED फ्लॅशची सुविधा आहे.

सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी फ्रंटमध्ये 5MP कॅमेरा मिळतो. फोनच्या सुरक्षेसाठी साइडला फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

हेही वाचा: चिंचपोकळीच्या चिंतामणीचा यंदाचा लूक समोर; PHOTO पाहून नजर हटणार नाही!

5000mAh बॅटरीचा सपोर्ट

बजेट स्मार्टफोन असूनही कंपनीने यात 5000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 10W चार्जिंगला सपोर्ट करते. त्यामुळे सामान्य वापरासाठी फोनची बॅटरी दिवसभर साथ देण्याची अपेक्षा आहे.

4G कनेक्टिव्हिटीसह अनेक फीचर्स (Lava Bold N4 Lite features)

कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत फोनमध्ये Dual 4G VoLTE, Wi-Fi 802.11 ac, Bluetooth 4.2 आणि GPS यांसारखे पर्याय देण्यात आले आहेत.

याशिवाय फोनमध्ये USB Type-C पोर्ट, 3.5mm हेडफोन जॅक आणि FM रेडिओ देखील मिळतो. त्यामुळे पारंपरिक हेडफोन वापरणाऱ्या ग्राहकांसाठीही हा फोन उपयुक्त ठरू शकतो.

बजेटमध्ये फोन घेणाऱ्यांसाठी पर्याय

Lava Bold N4 Lite हा मुख्यतः एंट्री-लेव्हल ग्राहकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. मोठी स्क्रीन, 5000mAh बॅटरी, 4G कनेक्टिव्हिटी आणि एक्स्पांडेबल स्टोरेज यांसारख्या सुविधा कमी किंमतीच्या फोनमध्ये मिळत असल्याने बजेटमध्ये स्मार्टफोन शोधणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक पर्याय ठरू शकतो.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts