Toxic box office collection: यशच्या ‘टॉक्सिक’ने बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा टप्पा पार केला असला, तरी वीकेंडला चित्रपटाच्या कमाईचा वेग मंदावला आहे. रविवारी कलेक्शनमध्ये झालेल्या घसरणीमुळे आता चिपत्रपटाच्या पुढील कमाईकडे सर्वांचे आहे.
यशाच्या बहुप्रतीक्षित टॉक्सिक’ चिपत्रपटाने प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली. पहिल्याच दिवशी शंभर कोटींचा आकडा पार करणाऱ्या या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर २०० कोटींची कमाईही (Toxic box office collection) ओलांडली. मात्र, सुरुवातीच्या जबरदस्त प्रतिसादानंतर चित्रपटाच्या कमाईचा वेग काहीसा कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
रविवारचा दिवस चित्रपटासाठी अपेक्षेइतका चांगला ठरला नाही. उपलब्ध बॉक्स आणि आकडेवारीनुसार, पाचव्या दिवशी ‘टॉक्सिक’ने भारतात सुमारे २३ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. त्याआधी शनिवारी चित्रपटाने २५. १५ कोटी रुपये कमावले होते. त्यामुळे एका दिवसात कमाईत घट झाली आहे.
रविवारी चित्रपटाचे देशभरात हजारो शो आयोजित करण्यात आले होते. मात्र, त्यातील सरासरी प्रेक्षक उपस्थिती तुलनेने कमी राहिली. त्यामुळे चित्रपटाची कमाई वाढण्याऐवजी स्थिरावल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी मिळालेल्या मोठ्या ओपनींगनंतर पुढील दिवसांमध्ये कमाईत सातत्याने घट होताना दिसत आहे. (Toxic India box office)
भाषेनुसार पाहिल्यास हिंदी आवृत्तीने रविवारी सर्वाधिक कमाई केली. हिंदीतून सुमारे १४.५० कोटी रुपये, कन्नडमधून ६.४० कोटी रुपये, तेलुगूमधून १.४० कोटी रुपये, तामीळमधून ६० लाख रुपये आणि मल्याळममधून सुमारे १० लाख रुपयांचा व्यवसाय झाल्याचे सांगितले जात आहे. (Toxic latest box office collection)
जागतिक स्तरावर मात्र चित्रपटाची कामगिरी तुलनेने चांगली आहे. ‘टॉक्सिक’ने जगभरात २८५ कोटी रुपयांहून अधिक कमाई केल्याचा दावा करण्यात आला आहे. परदेशातील बाजारपेठेतही चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे.
‘टॉक्सिक’मध्ये यशसोबत नयनतारा, कियारा अडवाणी, तारा सुतारिया, रुक्मिणी वसंत आणि हुमा कुरेशी यांच्या भूमिका आहेत. गीतू मोहनदास यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आता आगामी दिवसांमध्ये चित्रपटाची कमाई पुन्हा वेग घेते की घट कायम राहते, याकडे बॉक्स ऑफिसचे लक्ष लागले आहे.





