निरंजन कामत । कोल्हापूर, प्रतिनिधी
Mumbai Kolhapur Ganeshotsav Special Trains 2026: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई- कोल्हापूर प्रवाशांसाठी मोठी खुशखबर आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ४ अतिरिक्त विशेष रेल्वे सेवा सुरू कारण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात चार विशेष रेल्वे धावणार आहेत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई–कोल्हापूर मार्गावर ४ अतिरिक्त गणपती विशेष रेल्वे सेवा (Mumbai Kolhapur special train) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांचा लाभ पुणे, सातारा, कराड, सांगली आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. विशेष गाड्यांचे आरक्षण सुरू करण्यात आले आहे.
हेही वाचा: जिथे अडथळे होते, तिथेच मिळणार यश! ११ सप्टेंबरला ‘या’ राशींसाठी शुभ दिवस
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–कोल्हापूर विशेष ट्रेन क्रमांक ०१४१७ ही १२ आणि १४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता मुंबईहून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ४.२० वाजता कोल्हापुरात पोहोचेल (Ganeshotsav special train 2026) .
तर कोल्हापूर–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ट्रेन क्रमांक ०१४१८ ही १२ आणि १४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री ००.०५ वाजता कोल्हापुरातून सुटून त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता मुंबईत पोहोचेल.
या गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली आणि मिरज येथे थांबे देण्यात आले आहेत.
विशेष ट्रेनमध्ये १ प्रथम वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ३ तृतीय वातानुकूलित, ४ शयनयान आणि ४ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील. याशिवाय गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि जनरेटर कारची व्यवस्था करण्यात आली आहे. (Mumbai Kolhapur train 2026)
दरम्यान, ०१४१७ आणि ०१४१८ या दोन्ही गाड्यांचे आरक्षण पीआरएस केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू आहे. प्रवाशांना रेल्वेच्या ‘रेलवन’ ॲपद्वारे तिकीट बुक करता येणार आहे. अनारक्षित डब्यांसाठी यूटीएस प्रणालीचा वापर करता येईल. विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी एनटीईएस ॲप किंवा भारतीय रेल्वेच्या (Central Railway special trains) चौकशी प्रणालीचा वापर करता येणार आहे.



