Breaking News :
  • Home
  • Top News
  • गणेश चतुर्थीला पुण्यात मोठा सोहळा! पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसियांच्या हस्ते भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा
Ganeshotsav 2026

गणेश चतुर्थीला पुण्यात मोठा सोहळा! पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसियांच्या हस्ते भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा

Bhausaheb Rangari Ganpati 2026
85

अमोल धर्माधिकारी | Pune Westin Beuro Head

Bhausaheb Rangari Ganpati 2026 : प्रतिनिधी – हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा जगप्रसिद्ध बासरी वादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते येत्या सोमवारी (दि. १४) दुपारी १२ वाजून ३० मिनिटांच्या मुहूर्तावर होणार आहे. त्यापूर्वी ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची जंगी आगमन मिरवणूक देखील निघणार आहे.

मंडळाचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘गणेश चतुर्थीला सकाळी बाप्पाची आरती होईल. त्यानंतर उत्सव मंडपातून सव्वा आठ वाजता श्रींची आगमन मिरवणूक सुरू होईल. या मिरवणुकीत श्रीराम पथक, नादब्रह्म, ज्ञानप्रबोधनी, आवर्तन,
वाद्यवृंद, समर्थ, शिवाय, इंद्र गर्जना, केशव शंखनाद ही ढोल पथके या प्राणप्रतिष्ठा मिरवणुकीत वादन करणार आहेत. याशिवाय आढावा बंधू यांचा नगरखाना आणि मर्दानी खेळ ही मिरवणुकीत पाहायला मिळणार आहेत.

हेही वाचा : लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन! बाप्पाचा राजेशाही थाट पाहून भक्त भारावले; पहिल्या झलकने सोशल मीडियावर धुमाकूळ

दुपारी १२.३० वाजता विधीवत प्राणप्रतिष्ठा सोहळा ( Bhausaheb Rangari Ganpati 2026 )

सकाळी सव्वा आठ वाजता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ( Bhausaheb Rangari ) भवनापासून मुख्य मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. भवनापासून छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने पुढे बुधवार चौकात आणि तेथून तांबडी जोगेश्वरी मंदिर, अप्पा बळवंत चौक, बाजीराव रस्ता मार्ग या मिरवणुकीचे आगमन गणेश सुवर्णधाम या सजावट मंदिरात होणार आहे. त्यानंतर साडे बारा वाजता जगप्रसिद्ध बासरी वादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया ( Hariprasad Chaurasia ) यांच्या हस्ते बाप्पाची विधीवत प्राणप्रतिष्ठा होणार असल्याची माहिती उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी दिली.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वाजत-गाजत मिरवणुकीनंतर जगप्रसिद्ध बासरी वादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित रहावे, ही विनंती!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts