Breaking News :
  • Home
  • संस्कृती
  • 17 सप्टेंबरपासून ग्रहांची चाल बदलणार; या 5 राशींसाठी सुरू होऊ शकतो भाग्योदयाचा काळ
राशी भविष्य

17 सप्टेंबरपासून ग्रहांची चाल बदलणार; या 5 राशींसाठी सुरू होऊ शकतो भाग्योदयाचा काळ

Sun Transit in Virgo 2026
16
Sun Transit in Virgo 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, 17 सप्टेंबरला सूर्य कन्या राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या या गोचराचा काही राशींवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

Sun Transit in Virgo 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा परिणाम सर्व राशींवर वेगवेगळ्या प्रकारे होतो. आता सूर्यदेव बुधाच्या कन्या राशीत प्रवेश करणार आहेत. 17 सप्टेंबरपासून 17 ऑक्टोबरपर्यंत सूर्य कन्या राशीत राहणार असल्याचे सांगितले जाते. या काळात काही राशींना आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे ज्योतिषीय मत आहे.

ज्योतिषशास्त्राच्या मते, सध्या सूर्य सिंह राशीत (Surya Gochar 2026) आहेत. उद्या 17 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजून 58 मिनिटांनी सूर्य कन्या राशीत प्रवेश करतील. सूर्य आणि बुधाच्या या स्थितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि आर्थिक बाबतीत सकारात्मक परिणाम जाणवू शकतात, असे (astrology predictions 2026)  ज्योतिषशास्त्रात मानले जाते. चला जाणून घेऊया, सूर्याच्या या गोचराचा कोणत्या 7 राशींना (Sun Transit September 2026) फायदा होऊ शकतो. (Surya Rashi Parivartan 2026)

हेही वाचा: केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्याला कट मारणं पडलं महागात; थेट गुन्हा दाखल, जाणून घ्या नेमकं प्रकरण…

मेष राशी

मेष राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचे कन्या राशीतील गोचर कामाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकते. व्यावसायिक जीवनात नवीन जबाबदारी किंवा एखादी नवीन भूमिका मिळण्याची शक्यता आहे. आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांची काही काळापासून रखडलेली कामे मार्गी लागू शकतात. मेहनतीचे अपेक्षित परिणाम मिळण्यास सुरुवात होऊ शकते. यासोबतच आत्मविश्वासही वाढण्याची शक्यता आहे.

कर्क राशी

कर्क राशीच्या जातकांना आर्थिक गोष्टींमध्ये मोठा दिलासा मिळू शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे. तसेच नोकरी करणाऱ्यांचे कामात लक्ष लागेल आणि त्याचा सकारात्मक परिणाम कामगिरीवर दिसू शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. पैशांशी संबंधित चिंता काही प्रमाणात कमी होऊन मानसिक समाधान मिळू शकते.

सिंह राशी

सूर्याचे गोचर सिंह राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवू शकते. तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढण्याची शक्यता असून, इतर लोक तुमच्या मतांकडे गांभीर्याने पाहू शकतात. नोकरीच्या ठिकाणी एखादी चांगली बातमी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संपर्कांमधून फायदा होण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असून आर्थिक गरजा हळूहळू पूर्ण होऊ शकतात.

कन्या राशी

सूर्याचे गोचर कन्या राशीतच होत असल्याने या राशीसाठी हा काळ विशेष मानला जात आहे. पुढील 30 दिवसांत आत्मविश्वास वाढण्यासोबतच रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना पुढे जाण्याच्या संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन प्रोजेक्ट किंवा काम मिळू शकते. या काळात एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचे हे गोचर सकारात्मक बदल घेऊन येऊ शकते, असे ज्योतिषीय मत आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते. एखाद्या जुन्या संपर्काचा भविष्यात फायदा होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होऊ शकते आणि उत्पन्नाशी संबंधित काही सकारात्मक बदल जाणवू शकतात.

धनु राशी

धनु राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये पुढे जाण्याच्या संधी मिळू शकतात. वरिष्ठांचा विश्वास वाढण्याची शक्यता असून, तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. व्यवसायात केलेले नियोजन फायदेशीर ठरू शकते. बराच काळ रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक अडचणी हळूहळू कमी होऊ शकतात.

मीन राशी

मीन राशीच्या व्यक्तींना कामातील अडचणींपासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या निर्णयांबाबत स्पष्टता मिळण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात. योग्य संधीची प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी काही नवीन मार्ग खुले होण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडूनही चांगले सहकार्य मिळू शकते.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts