Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Facebook-Instagram वापरण्यासाठी आता पैसे द्यावे लागणार? Meta ने आणली नवीन Paid Subscription सेवा; जाणून घ्या काय मिळणार
विज्ञान- तंत्र

Facebook-Instagram वापरण्यासाठी आता पैसे द्यावे लागणार? Meta ने आणली नवीन Paid Subscription सेवा; जाणून घ्या काय मिळणार

Instagram Paid Version
34

Instagram Paid Version : सोशल मीडिया वापरणाऱ्या कोट्यवधी युजर्ससाठी Meta ने मोठी घोषणा केली आहे. Facebook, Instagram आणि WhatsApp साठी Meta One नावाची नवीन subscription service सुरू करण्यात आली आहे. या सेवेमध्ये AI, content creation, customization आणि creators/businesses साठी अतिरिक्त features देण्यात येणार आहेत.

मात्र Facebook आणि Instagram आता पूर्णपणे paid झालेले नाहीत. Meta च्या म्हणण्यानुसार या प्लॅटफॉर्मचा core experience freeच राहणार आहे. Paid subscription घेतल्यास अतिरिक्त सुविधा आणि अधिक AI usage मिळणार आहे.

Instagram आणि Facebook साठी किती पैसे?

Meta One अंतर्गत single-product plans मध्ये:

  • Instagram Plus — $3.99 प्रति महिना
  • Facebook Plus — $3.99 प्रति महिना
  • WhatsApp Plus — $2.99 प्रति महिना

तसेच Core आणि Premium असे bundle plans देखील उपलब्ध आहेत. Meta ने सांगितले आहे की किंमत आणि उपलब्ध सुविधा देश, app आणि account नुसार बदलू शकतात.

हेही वाचा : करवीरचा राजा गणपती कोसळला; विसर्जन मिरवणुकीत नेमकं काय घडलं?

Paid version मध्ये काय मिळणार? ( Instagram Paid Version )

Instagram Plus आणि Facebook Plus मध्ये customization आणि अतिरिक्त social features देण्यात येत आहेत. Meta One च्या bundle plans मध्ये अधिक AI usage, image/video generation आणि Instagram मधील AI tools चा अधिक वापर यांसारख्या सुविधा मिळणार आहेत.

Creators आणि businesses साठी Meta ने वेगळे subscription plans आणले आहेत. यामध्ये enhanced profiles, follow-related tools, analytics, publishing features आणि Meta Business Agent सारख्या सुविधांचा समावेश आहे.

मग Facebook-Instagram बंद किंवा पूर्णपणे paid होणार का?

सध्या नाही. Meta ने स्पष्ट केले आहे की Facebook, Instagram आणि Meta AI चा मूलभूत अनुभव free राहणार आहे. Paid subscription ही अतिरिक्त सुविधा मिळवण्यासाठी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts