Breaking News :
बिजनेस

सोन्याच्या दरात घसरण का होतेय? या 5 कारणांमुळे वाढला विक्रीचा दबाव

Gold Price Today
56
Gold Price Today: सोन्याच्या दरात सध्या चढ-उतार पाहायला मिळत असून, जागतिक बाजारातील घडामोडींचा त्यावर मोठा परिणाम होत आहे.

सोनं म्हणजे सुरक्षित गुंतवणूक, अशी सर्वसाधारण धारणा आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलांमुळे सोन्याच्या किमतीत सध्या चढ- उतार पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सोन्याच्या भावात अचानक नरमाई का आली, असा प्रश्न गुंतवणूकदार आणि ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे.

सोन्याच्या किमतीवर ( Gold Rate )  केवळ भारतातील मागणीचा (Indian Gold Market) परिणाम होत नाही. अमेरिकन डॉलरची दिशा, तेथील व्याजदर, बाँड यील्ड, जागतिक आर्थिक परिस्थिती आणि गुंतणूकदारांची खरेदी – विक्री यांसारखे अनेक घटक सोन्याचा दर (Gold Price Fall) ठरवतात.

हेही वाचा: Teacher Recruitment Scam: शिक्षक भरतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह! नागपूर विभागातील 1,397 नियुक्त्यांची फेरपडताळणी

डॉलरच्या मजबुतीचा सोन्यावर दबाव

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा व्यवहार प्रामुख्याने डॉलरमध्ये (Gold Investment Tips) केला जातो. त्यामुळे अमेरिकन चलन मजबूत झाल्यास इतर देशांतील खरेदीदारांसाठी सोनं तुलनेने महाग होतं. याचा परिणाम सोन्याच्या मागणीवर होऊ शकतो. डॉलरमध्ये होणारी हालचाल त्यामुळे सोन्याच्या दरासाठी महत्त्वाचा संकेत मानली जाते. ( Latest Marathi News )

बाँड यील्ड वाढल्याने गुंतवणुकीचा कल बदलतो

सोन्याकडून नियमित व्याज मिळत नाही. त्यामुळे अमेरिकन सरकारी बाँडसारख्या पर्यायांवरील परतावा वाढला तर काही गुंतवणूकदार आपला पैसा त्या साधनांकडे वळवू शकतात. अमेरिकन ट्रेझरी यील्डमधील वाढ ही सोन्यासाठी दबाव निर्माण करणाऱ्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. ( LS Marathi News Channel )

व्याजदरांबाबत बदललेल्या अपेक्षा

अमेरिकेतील महागाई आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित आकडेवारीकडे जगभगरातील बाजारांचे लक्ष असते. व्याजदर अपेक्षेपेक्षा जास्त काळ उच्च पातळीवर राहण्याची शक्यता निर्माण झाली तर डॉलर आणि बाँड यील्डला आधार मिळू शकतो. यामुळे सोन्यासारख्या व्याज न देणाऱ्या मालमत्तेची मागणी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता असते.

मोठ्या वाढीनंतर नफावसुली

सोन्याच्या दरात याआधी झालेल्या मोठ्या तेजीमुळे काहीगुंतावणूकदारांनी नफा मिळाला. त्यामुळे त्यांनी खरेदीऐवजी विक्री करण्यास सुरुवात केल्यास बाजारात प्रॉफिट बुकिंगचा दबाव निर्माण होतो. अशा परिस्थितीत नवीन खरेदी कमी आणि विक्री वाढल्यास किमतीत अल्पकालीन घसरण दिसू शकते.

बाजारातील मागणी आणि जागतिक परिस्थिती

सोन्याची किंमत ठरवतात जागतिक बाजारातील मागणीही महत्वाची असते. भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेत सणासुदीचा काळ, लग्नसराई, दागिन्यांची मागणी आणि ग्राहकांच्या किंमतीबाबतच्या अपेक्षा यांचा स्थानिक दरावर परिणाम होतो. भाव आणखी कमी होण्याची शक्यता वाटल्यास काही ग्राहक खरेदी पुढे ढकलतात. त्यामुळे बाजारातील मागणीवर परिणाम होऊ शकतो. (Gold Price News)

भारतीय ग्राहकांसाठी याचा अर्थ काय?

जागतिक बाजारात सोन्याच्या दरात झालेल्या हालचालींचा परिणाम भारतीय बाजारातही दिसतो. मात्र भारतातील अंतिम किंमत ठरवताना आंतरराष्ट्रीय सोन्याचा भाव, डॉलर- रुपया विनियम दर, आयात शुल्क, स्थानिक मागणी आणि कर यांसारखे घटकही महत्वाचे असतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं स्वस्त झालं म्हणून भारतातही त्याच प्रमाणात दर कमी होतीलच. असं नाही.

पुढील काळात कोणत्या गोष्टींवर लक्ष ठेवायचं?

सोन्याच्या पुढील दरासाठी अमेरिकेतील महागाईची आकडेवारी, फेडरल रिझर्व्हची व्याजदरविषयक भूमिका, डॉलर इंडेक्स, बाँड यील्ड आणि जागतिक आर्थिक परिस्थिती महत्त्वाची ठरणार आहे.

त्यामुळे सध्याच्या काळात सोन्याच्या दरात चढ-उतार कायम राहू शकतात. ग्राहकांनी किंवा गुंतवणूकदारांनी खरेदीचा निर्णय घेताना केवळ एका दिवसाच्या दराकडे न पाहता बाजारातील व्यापक परिस्थितीचाही विचार करणे महत्त्वाचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts