Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • पुण्यात 123 मुली गायब झाल्याचा दावा; व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे खळबळ, पोलिसांनी सांगितलं सत्य
Pune

पुण्यात 123 मुली गायब झाल्याचा दावा; व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे खळबळ, पोलिसांनी सांगितलं सत्य

Pune 123 Girls Missing
16
Pune 123 Girls Missing: पुणे शहरात अवघ्या 22 तासांत 123 मुली आणि महिला गायब झाल्याचा दावा करणारी एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ऑडिओमुळे पुणे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक नागरिकांकडून या दाव्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, पुणे पोलिसांनी या दाव्याची चौकशी करून हा दावा अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि विविध मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर एक ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे. या ऑडिओमध्ये पुणे शहरातून 22 तासांच्या कालावधीत 123 मुली ( Pune 123 Girls Missing ) आणि महिलांना पळवून नेल्याचा दावा करण्यात येत आहे.

हा ऑडिओ मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीती निर्माण झाली. विशेषतः मुली आणि महिलांच्या (Pune Girls Missing News) सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जाऊ लागली.

हेही वाचा: घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत… नवरात्र 2026 चे संपूर्ण पंचांग जाणून घ्या; कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा?

पोलिसांनी केला दाव्याचा तपास

व्हायरल ऑडिओची माहिती समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी ( Pune Viral Audio ) या प्रकरणाची चौकशी केली. तपासानंतर पुणे शहरात अशा प्रकारे 123 मुली किंवा महिलांना पळवून नेल्याची कोणतीही घटना घडलेली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल (Pune Police News) होत असलेला दावा तथ्यहीन असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन

पुणे पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिप, व्हिडीओ किंवा मेसेजवर तत्काळ विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही माहिती पुढे शेअर करण्यापूर्वी तिची अधिकृत स्रोतांकडून खातरजमा करावी, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

सोशल मीडियावर (Viral Audio Clip Pune) एखादी माहिती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली म्हणजे ती खरी असेलच असे नाही. त्यामुळे अपुऱ्या किंवा खोट्या माहितीतून नागरिकांमध्ये भीती निर्माण होऊ नये, यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने माहिती शेअर करण्याची गरज आहे.

पुणेकरांनी काय काळजी घ्यावी?

पोलिसांकडून आलेली अधिकृत माहिती किंवा विश्वासार्ह माध्यमांमधून मिळालेल्या माहितीवरच विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे. संशयास्पद ऑडिओ किंवा मेसेज आल्यास तो पुढे फॉरवर्ड करण्याऐवजी त्याची सत्यता तपासावी.

दरम्यान, 123 मुली आणि महिला गायब झाल्याचा दावा करणारी व्हायरल ऑडिओ क्लिप ही अफवा असल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केल्याने नागरिकांनी घाबरून न जाता सोशल मीडियावरील अशा संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts