• Home
  • ताज्या बातम्या
  • पुण्यातून फ्रान्सला गेला, पण गंभीर गुन्ह्यात अडकला! तरुणाला 20 वर्षांची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?
देश

पुण्यातून फ्रान्सला गेला, पण गंभीर गुन्ह्यात अडकला! तरुणाला 20 वर्षांची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

Pune Man France Case
23
Pune Man France Case: शिक्षणासाठी फान्समध्ये गेलेल्या पुण्यातील २९ वर्षीय तरुणाला बाल लैंगिक शोषण आणि सायबर गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणात २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय तपासातून उघड झालेलं हे प्रकरण नेमकं काय आहे? जाणून घ्या सविस्तर.

शिक्षणासाठी फ्रान्समध्ये (Pune Man France Case) गेलेल्या पुण्यातील २९ वर्षीय रोहन राणे (Rohan Rane Case ) याला बाल लैंगिक शोषण आणि सायबर गुन्ह्यांशी (Child Sexual Abuse Case) संबंधित प्रकरणात फ्रान्समधील न्यायालयाने २० वर्षांच्या (France Court Verdict) कारावासाची शिक्षा सुनावल्याची (20 Year Prison Sentence) बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या ऑनलाइन गुन्हेगारी गटाशी त्याचा संबंध असल्याचा आरोप (Cyber Crime News) होता. तपासातील डिजिटल पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने त्याला दोषी ठरवले.

डिस्कॉर्डच्या माध्यमातून अल्पवयीन मुलांना लक्ष्य केल्याचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, उच्च शिक्षणासाठी फ्रान्समध्ये वास्तव्यास असताना राणे याने डिस्कॉर्ड या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा (International Criminal Network) वापर केला. ‘CVLT’ नावाच्या ऑनलाइन गुन्हेगारी गटाच्या माध्यमातून विविध देशांतील अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढले जात असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे.

हेही वाचा: दिल्लीमध्ये राजकीय रणधुमाळी! राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली विरोधकांचा सर्वोच्च न्यायालयाकडे मोर्चा

या मुलांवर दबाव टाकून त्यांच्याकडून हिंसक आणि लैगिंक स्वरूपाचे व्हिडिओ तयार करून घेतले जात असल्याचेही समोर आले. या प्रकरणामुळे इंटरनेटवरील अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अमेरिकेकडून मिळालेल्या माहितीवरून तपास

या प्रकरणाची माहिती सुरुवातीला अमेरिकेतील तपास यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर संबंधित माहिती फ्रान्समधील अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली. या माहितीच्या आधारे २०२१ मध्ये फ्रान्समधील आंतिब शहरातून राणे याला अटक करण्यात आली.

त्यानंतर न्यायालयात खटला चालवण्यात आला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि डिजिटल पुराव्यांचा विचार करून न्यायालयाने त्याला दोषी ठरवत २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी वकिलांनी त्याच्यासाठी ३० वर्षांच्या शिक्षेची मागणी केली होती.

अनेक देशांतील पीडितांची ओळख

तपासादरम्यान भारत, अमेरिका, जर्मनी आणि न्यूझीलंड यांसारख्या देशांतील व्यक्तींचा या ऑनलाइन नेटवर्कशी संबंध असल्याचे समोर आल्याचे वृत्त आहे. या प्रकरणात 20 हून अधिक पीडित मुलांची ओळख पटवण्यात आली. त्यापैकी सज्ञान झालेल्या सहा पीडितांनी न्यायालयात साक्ष दिल्याची माहिती आहे.

या नेटवर्कमधील इतर काही संशयितांवर अमेरिकेतही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पहिला निकाल सुनेत्रा पवारांच्या बाजूने; ९२ मतांसह सोरटे विजयी

ऑनलाइन सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत

या प्रकरणामुळे सोशल मीडिया आणि ऑनलाइन गेमिंग किंवा चॅटिंग प्लॅटफॉर्मवर अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा अधोरेखित झाला आहे. अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन संवाद साधताना मुलांना लक्ष्य केले जाण्याचा धोका असतो. त्यामुळे पालकांनी मुलांच्या ऑनलाइन वापराबाबत जागरूक राहणे आणि संशयास्पद वर्तनाची माहिती संबंधित यंत्रणांना देणे महत्त्वाचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts