Breaking News :
  • Home
  • देश
  • Tesla Flying Car : एलॉन मस्कची उडणारी कार भारतात चालेल का? ट्रॅफिकमध्ये काय होणार?
विज्ञान- तंत्र

Tesla Flying Car : एलॉन मस्कची उडणारी कार भारतात चालेल का? ट्रॅफिकमध्ये काय होणार?

Tesla Flying Car
23

Tesla Flying Car : एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने एक उडणारी कार लॉन्च केलीये आणि जगभरात फक्त याच कारची जोरदार चर्चा होत आहे….रोडस्टर २.०’ ( Tesla Roadster ) असं या कारचं नाव आहे…ही कार काही काळ हवेत झेप घेऊ शकते…या कारच्या लॉन्च इव्हेंटवेळी ही कार एका उभ्या रस्त्यावर धावताना दिसली…कार या रस्त्यावर चिटकून चालत होती, ती खाली पडलीच नाही…जेव्हा रस्ता संपला आणि ती खाली पडली तेव्हा स्पेसएक्सच्या रॉकेट थ्रस्टर तंत्रज्ञानामुळे हवेत पलटी मारून चारही चाकांवर सुरक्षित लँडिंग करते….

मात्र भारतात या कारपेक्षा तिच्यावर तयार होणाऱ्या विनोदी कल्पनांचीच जास्त चर्चा रंगत आहे…. कारण ही कार भारतात आली तर तिचा वापर कसा होईल, ट्रॅफिकमध्ये ती कुठे उतरेल, विजेच्या तारांचं काय होईल आणि ट्रॅफिक पोलीस तिच्यावर कोणत्या नियमांनुसार दंड आकारतील, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत…

एलॉन मस्कची उडणारी कार भारतात चालू शकते का? ( Tesla Flying Car )

टेस्लाने 15 ऑक्टोबरला अमेरिकेतील टेक्सासमध्ये आपल्या नव्या रोडस्टर सुपरकारचं लॉन्च इव्हेंट दाखवलं…ही साधी इलेक्ट्रिक कार नाही… यामध्ये टेस्ला आणि स्पेसएक्सच्या इंजिनिअरांनी विकसित केलेल्या विशेष थ्रस्टर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय… या यंत्रणेमुळे कारला काही काळ हवेत उचलणं, अडथळ्यांवरून झेप घेणं आणि नियंत्रित पद्धतीने खाली उतरवणं शक्य असल्याचं दाखवण्यात आलं… मात्र ही कार विमानाप्रमाणे एका शहरातून दुसऱ्या शहरात हवेतून प्रवास करू शकते, असं अद्याप सिद्ध झालेलं नाही… त्यामुळे तिला पूर्ण क्षमतेची उडणारी कार म्हणण्यापेक्षा हवेत मर्यादित झेप घेऊ शकणारी प्रायोगिक सुपरकार म्हटलं जात आहे…अवघ्या एका सेकंदापेक्षा कमी वेळात 100 किमीचा वेग पकडण्याची क्षमता असलेल्या या हाय-टेक कारचे अधिकृत बुकिंग आता जागतिक स्तरावर सुरू झाले आहे…जर या उडणाऱ्या कारची बुकींग करायची असेल तर 2.5 कोटी रूपयांच्या आसपास पैसे भरावे लागतील…भारतील सर्वसामान्य व्यक्तीच्या तर ही कार अवाक्याच्या बाहेर आहे…

पण समजा उद्या ही कार भारतात आली आणि तिच्या उड्डाणाला परवानगीही मिळाली, तर काय चित्र पाहायला मिळेल? यावरूनच सोशल मीडियावर अनेक AI ने तयार करण्यात आलेले काही व्हिडिओ व्हायरल होत आहे…. पहिली कल्पना म्हणजे चोर आणि पोलीस… एखाद्या चोराने ही कार वापरली आणि पोलीस त्याच्या मागे लागले, तर तो एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे कार हवेत उडवून पळून जाईल.. समोर उड्डाणपूल आला की कार हवेत उडवून तो थेट वरच्या रस्त्यावर जाईल आणि आपला मार्ग बदलेल… पोलीस फक्त खालीच सायरन वाजवत बसून राहिल…त्यांना चोराला पकडणं अशक्य होईल….

हेही वाचा : Tesla Roadster Car : एलॉन मस्क यांची उडणारी कार? जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

ट्रॅफिक जाममधून उडून जाणं शक्य आहे का? ( Elon Musk Flying Car )

दुसरी गंमत म्हणजे भारतातील विजेच्या तारा… अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये रस्त्यांच्या वरून विजेच्या तारा, इंटरनेट केबल आणि इतर वायरिंग गेलेलं असतं… अशा परिस्थितीत कार हवेत झेप घेताना एखाद्या तारेला धडकली तर तिथेच अडकून राहिल.. कार उडवण्यासाठी केवळ ताकदवान इंजिन किंवा थ्रस्टर असून चालणार नाही… आजूबाजूला किती मोकळी जागा आहे, वर कोणते अडथळे आहेत, झेप घेताना कार कोणत्या दिशेला जाईल आणि खाली उतरण्यासाठी सुरक्षित जागा आहे का, हेही महत्त्वाचं ठरेल… उच्चदाबाच्या विद्युत तारांना कार धडकली की मग तर सगळंच संपलं…

तिसर म्हणजे भारतातील ट्रॅफिक… मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरूसारख्या शहरांमध्ये वाहतूक कोंडी हा रोजचा मोठा डोके दुखीचा प्रश्न बनलेला आहे… एखाद्या श्रीमंत व्यक्तीने आपली महागडी रोडस्टर कार ट्रॅफिकमधून हवेत उडवली, तर सुरुवातीला त्याला मोठा आनंद होईल… पण खरी अडचण कार खाली उतरवताना सुरू होईल… कारण जिथे कार उतरवायची आहे, तिथे आधीच दुचाकी, रिक्षा, बस आणि चारचाकी वाहनांची रांग लागलेली असेल… मग कार पुन्हा हवेतच थांबवायची का? की ट्रॅफिक संपेपर्यंत दुसरी जागा शोधायची? अर्थात टेस्लाच्या रोडस्टरमध्ये हेलिकॉप्टरप्रमाणे दीर्घकाळ हवेत स्थिर राहण्याची क्षमता सिद्ध झालेली नाही… त्यामुळे भारतातील ट्रॅफिकमध्ये या कारलाही अडकून पडावं लागेल…

विजेच्या तारा आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचं आव्हान

भारतातील रस्त्याची देखील मोठी गमंत आहे… एखाद्या चालकाने खड्डा चुकवण्यासाठी कार हवेत उडवली, पण खाली उतरताना आणखी मोठा खड्डा समोर आला तर? कधी पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलेलं असतं… कधी रस्त्याच्या बाजूला उघडी गटारं असतात… तर कधी नाल्याजवळ पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसते… त्यामुळे कार हवेत उडवली तर थेट गटारीमध्ये जाईल…किंवा थेट उघड्या चेंबरमध्ये…त्यामुळे हवेत कार उडवून म्हणजे अपघाताला निमंत्रण दिल्यासारखं आहे…

या कारचा अजून एक व्हायरल होत असलेला व्हिडिओ म्हणजे ट्रॅफिक पोलिसांचा…. भारतात वाहन चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, विमा, वाहतुकीचे नियम आणि वेगमर्यादा यांचं पालन करावं लागतं… आता समजा रोडस्टर रस्त्यावरून धावत असताना अचानक हवेत झेप घेत असेल, तर तिच्यावर नेमके कोणते नियम लागू होतील? ती रस्त्यावरचं वाहन मानायची की विमान? रस्त्यावर असताना वाहतूक पोलिसांचे नियम लागू होतील आणि हवेत गेल्यावर नागरी विमान वाहतूक विभागाचे नियम लागू होतील का? यावरूनही अनेक विनोदी कल्पना केल्या जात आहेत… कारचालकाने सगळे कागद दाखवले तरी पोलीस म्हणतील, तुमच्या कारचं फ्लाइंग लायसन्स कुठे आहे? हवेत जाताना इंडिकेटर दाखवला का? स्पीड लिमिट किती होती… आणि उड्डाणाची परवानगी घेतली का? जर चालकाने नाही म्हटलं की पोलिसांनी लावला दंड…जरी चालकाने नियम पाळले तरीही काही पोलीस तर कोणतेही नियम काढून थेट फाईन मारण्याची धमकी देत लाच घेतात…

हेही वाचा : Elon Musk Starlink India : एलोन मस्क भारताला हायजॅक करणार? अंबानींशी वादामागचं नेमकं कारण काय?

टेस्ला रोडस्टर भारतात कधी येणार? ( Tesla Roadster )

भारतात रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांसाठी मोटार वाहन कायद्याची चौकट आहे… तर हवेत उडणाऱ्या यंत्रांसाठी नागरी विमान वाहतुकीचे स्वतंत्र नियम आहेत… नागरी विमान वाहतूक महासंचालनालय म्हणजेच डीजीसीए हे विमानांच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रमाणपत्रं, नोंदणी आणि वैमानिकांच्या परवान्यांबाबत काम पाहतं… त्यामुळे कोणतीही कार हवेत उडू शकते म्हणून तिला भारतीय शहरांमध्ये उड्डाणाची आपोआप परवानगी मिळणार नाही… तिच्या तंत्रज्ञानाचं मूल्यांकन, सुरक्षिततेची चाचणी आणि संबंधित नियमांनुसार मंजुरी आवश्यक असेल…

उड्डाण करताना होणारा अपघात ही तर एक वेगळीच गोष्ट आहे…कार हवेत उडाली आणि तिचे इंजिन फेल झाले किंवा इतर काही बिघाड झाली तर ती एखाद्या इमारतीला जाऊन धडकू शकते…किंवा खाली येऊन नागरिकांवर, गाड्यांवर कोसळून शकते…यामुळे अपघाताचा मोठा धोका वाढतो… तारेला धडकली तर विद्यूत पुरवठा खंडीत होऊ शकतो…भारतात तर या कारसाठी अनेक धोके दिसत आहे…भारतात ही कार येईल की नाही माहिती नाही…मात्र कंपनीने अद्याप या नव्या रोडस्टरचं उत्पादन सुरू केलेलं नाही… 2028 मध्ये उत्पादन सुरू करण्याचं उद्दिष्ट आहे..

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics, UI & UX.Education : Bachelor Of Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. Awarded By : 🥇The Best Digital Marketer And Technologist Award🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts