Menopause Symptoms: मेनोपॉज हा कोणताही आजार नसून महिलांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक टप्पा आहे. या काळात हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. मात्र, मासिक पाळी पूर्णपणे बंद होण्यापूर्वीही शरीर काही संकेत देतं. हे संकेत कोणते आणि या काळात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, जाणून घ्या.
Menopause Symptoms in Women: मेनोपॉज हा कोणताही आजार नसून महिलांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक टप्पा आहे. या काळात हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे शरीरात (Women’s Health) अनेक बदल दिसून येतात. अचानक घाम येणे, मासिक पाळी अनियमित होणे, झोपेचा त्रास आणि मूड स्विंग्स यांसारखी लक्षणे (Early Menopause Signs) जाणवू शकतात. मात्र, योग्य आहार, नियमित व्यायाम आणि आरोग्याची काळजी घेतल्यास या काळातील त्रास कमी ( Menopause Health Tips ) करण्यास मदत होऊ शकते.
मेनोपॉज म्हणजे नेमकं काय?
मेनोपॉज म्हणजे महिलांची मासिक पाळी (Menopause Symptoms in Women) कायमस्वरूपी बंद होण्याची अवस्था. इतर कोणतेही कारण नसताना सलग १२ महिने मासिक पाळी आली नाही, तर मेनोपॉज झाल्याचे मानले जाते. साधारणपणे वयाच्या ४५ ते ५५ वर्षांदरम्यान ही अवस्था येते. मात्र, प्रत्येक महिलेचा अनुभव वेगळा असू शकतो.
हेही वाचा: Ajay Devgn Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्यावर BMC ची नोटीस; काय आहे प्रकरण?
या काळात अंडाशयांची कार्यक्षमता कमी होते आणि इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सच्या पातळीत बदल होतात. त्यामुळे मासिक पाळी बंद होण्यापूर्वीच काही महिलांना विविध शारीरिक आणि मानसिक लक्षणे जाणवू लागतात. या संक्रमणाच्या काळाला पेरिमेनोपॉज म्हणतात.
मासिक पाळी बंद होण्यापूर्वी शरीर कोणते संकेत देतं?
१. मासिक पाळी अनियमित होणे
प्रत्येक महिलेल्या मेनोपॉज जवळ येत असताना मासिक पाळीच्या सायकलमध्ये बदल होऊ शकते. कधी कधी पाळी लवकर येते, तर कधी उशिरा येते. काही महिलांमध्ये रक्तस्रावाचे प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकते. मात्र, अतिरक्तस्राव किंवा असामान्य रक्तस्राव होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
२. अचानक गरम झटके येणे
मेनोपॉजच्या काळात अनेक महिलांना अचानक शरीरात उष्णता जाणवते. चेहरा आणि मान लाल होणे, घाम येणे किंवा हृदयाची धडधड वाढल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसू शकतात. याला हॉट फ्लॅश म्हणतात.
३. रात्री घाम येणे
रात्री झोपताना अचानक घाम येणे हे मेनोपॉजचे आणखी एक सामान्य लक्षण आहे. त्यामुळे झोपमोड होऊ शकते आणि सकाळी थकवा जाणवू शकतो. खोली थंड ठेवणे आणि हलके कपडे वापरणे यामुळे काही प्रमाणात आराम मिळू शकतो.
४. मूड स्विंग्स आणि चिडचिड
हार्मोन्समधील बदल, झोपेचा अभाव आणि दैनंदिन ताणतणाव यांमुळे काही महिलांना चिडचिड, चिंता, अस्वस्थता किंवा मूडमध्ये अचानक बदल जाणवू शकतात. हा त्रास सतत होत असल्यास दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांकडे जावे.
५. वजन वाढणे
वाढते वय, स्नायूंचे प्रमाण कमी होणे आणि शारीरिक हालचालींमध्ये घट यांमुळे मेनोपॉजच्या आसपास वजन वाढू शकते. विशेषतः पोटाभोवती चरबी जमा होण्याची शक्यता वाढते. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यामुळे वजन नियंत्रणात ठेवता येते.
६. झोपेचा त्रास आणि थकवा
रात्री घाम येणे, चिंता किंवा शरीरातील बदलांमुळे झोप पूर्ण होत नाही. परिणामी दिवसभर थकवा, एकाग्रतेचा अभाव आणि चिडचिड जाणवू शकते. झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित ठेवल्याने फायदा होऊ शकतो.
७. योनीमार्गात कोरडेपणा
इस्ट्रोजेनची पातळी कमी झाल्यामुळे योनीमार्गातील ओलावा कमी होऊ शकतो. त्यामुळे खाज, जळजळ किंवा लैंगिक संबंधांदरम्यान वेदना जाणवू शकतात. या समस्येसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेता येतात.
मेनोपॉजच्या काळात महिलांनी कोणती काळजी घ्यावी?
१. संतुलित आहार घ्या
दैनंदिन आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, कडधान्ये, संपूर्ण धान्ये आणि प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करा. हाडांच्या आरोग्यासाठी दूध, दही, नाचणी आणि इतर कॅल्शियमयुक्त पदार्थ खाणे फायदेशीर ठरते. व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने पूरक औषधे घेता येतात.
२. नियमित व्यायाम करा
दररोज चालणे, योगासने आणि स्नायू बळकट करणारे व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. नियमित व्यायामामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास, हाडांचे आरोग्य जपण्यास आणि मनःस्थिती सुधारण्यास मदत होऊ शकते.
हेही वाचा: सायंकाळी ४ वाजता कुरकुरे किंवा चिप्स रोज खाताय? थांबा… आरोग्यावर होऊ शकतात हे गंभीर परिणाम
३. पुरेशी झोप घ्या
दररोज ठरावीक वेळी झोपण्याची सवय लावा. झोपण्यापूर्वी चहा-कॉफीचे सेवन टाळा आणि बेडरूमचे तापमान आरामदायी ठेवा. रात्री घाम येत असल्यास हलके कपडे वापरा.
४. मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या
ध्यान, दीर्घ श्वसन, योग आणि आवडत्या छंदांसाठी वेळ काढा. चिंता किंवा नैराश्याचा त्रास वाढत असल्यास समुपदेशन किंवा कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपीचा उपयोग होऊ शकतो. गरज असल्यास मानसिक आरोग्यतज्ज्ञांची मदत घ्या.
५. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या
गरम झटके, झोपेचा त्रास किंवा योनीमार्गातील कोरडेपणा यांसारखी लक्षणे दैनंदिन जीवनावर परिणाम करत असल्यास डॉक्टरांशी चर्चा करा. काही महिलांसाठी हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (HRT) उपयुक्त ठरू शकते.
मेनोपॉजमध्ये कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये?
मेनोपॉजच्या काळात काही बदल नैसर्गिक असले तरी प्रत्येक लक्षणाचे कारण मेनोपॉजच असेल असे नाही. मासिक पाळीचे प्रमाण खूप वाढणे, सतत किंवा असामान्य रक्तस्राव होणे, तीव्र वेदना जाणवणे किंवा सलग १२ महिने पाळी बंद राहिल्यानंतर पुन्हा रक्तस्राव होणे अशा परिस्थितीत वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.






