Deepika-Ranveer Singh Second Daughter Name: बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या जोडप्याने आपल्या दुसऱ्या लेकीचं नाव जाहीर करत चाहत्यांना खास आनंदाची बातमी दिली. त्यांच्या धाकट्या मुलीचं नाव ‘देवी पदुकोण सिंग’ असं ठेवण्यात आलं आहे.
बॉलिवूडची लोकप्रिय जोडी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या दुसऱ्या लेकीचं नाव जाहीर केलं आहे.(Second Daughter Name) त्यांच्या धाकट्या मुलीचं नाव ‘देवी पदुकोण सिंग’ (Devi Padukone Sing)असं असून, यानिमित्ताने शेअर केलेल्या खास फोटोने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. या फोटोमध्ये मोठी मुलगी दुआ आपल्या धाकट्या बहिणीला प्रेमाने किस करताना दिसते. बहिणींमधील हा गोड क्षण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून, चाहत्यांकडून या कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दसऱ्याच्या मुहूर्तावर लेकीच्या नावाची घोषणा
दीपिका आणि रणवीर यांनी २० ऑक्टोबर रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडिया (Instagram Account)अकाउंटवर हा कौटुंबिक फोटो शेअर केला. या पोस्टसोबत त्यांनी ‘Of Love & Abundance…’ असे कॅप्शन देत ‘देवी पदुकोण सिंह’ हे नाव जाहीर केले. दोघांनीही आपल्या मुलीच्या नावात आई आणि वडील या दोघांची आडनावे समाविष्ट केली आहेत. या पोस्टनंतर चाहत्यांनी आणि मनोरंजनविश्वातील अनेकांनी या कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
दुआनंतर घरात आले दुसरे कन्यारत्न
दीपिका आणि रणवीर यांनी नोव्हेंबर २०१८ मध्ये लग्न केले. सप्टेंबर २०२४ मध्ये त्यांच्या पहिल्या मुलीचा, दुआचा जन्म झाला.(Dua Birth) त्यानंतर १९ सप्टेंबर २०२६ रोजी या जोडप्याने दुसऱ्या मुलीचे स्वागत केले. आता दसऱ्याच्या निमित्ताने तिचे नाव आणि पहिला कौटुंबिक फोटो चाहत्यांसोबत शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या स्टार कुटुंबाची चर्चा रंगली आहे.
कामाच्या आघाडीवरही दीपिका चर्चेत
मातृत्वाचा आनंद अनुभवत असतानाच दीपिका पदुकोणच्या आगामी चित्रपटांबाबतही (Upcoming Movies) चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. ती अल्लू अर्जुन आणि दिग्दर्शक अटली यांच्या ‘राका’ (raaka) या चित्रपटाशी जोडलेली आहे. तिच्या आगामी चित्रपटांबाबतची अधिकृत माहिती आणि प्रदर्शनाच्या तारखा निर्मात्यांकडून जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होतील. एकूणच, दुसऱ्या मुलीचे नाव जाहीर करत दीपिका आणि रणवीर यांनी चाहत्यांना आपल्या कुटुंबातील खास क्षणाची झलक दिली आहे. दुआ आणि देवीसोबतचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
हेही वाचा : Festival Entertainment : सणासुदीत मनोरंजनाची मेजवानी! चित्रपटगृहांपासून ओटीटीपर्यंत नव्या चित्रपटांची चर्चा









