• Home
  • देश
  • भारतीय हँडबॉल संघाने बांगलादेश ला नमवत जिंकले सुवर्णा पदक
फूड

भारतीय हँडबॉल संघाने बांगलादेश ला नमवत जिंकले सुवर्णा पदक

India vs Bangladesh Handball
23

अमोल धर्माधिकारी | Pune Westin Beuro Head

India vs Bangladesh Handball : बांगलादेश येथे झालेल्या बेगम खलिदा जिया आयएचएफ नेशन ट्रॉफी एशिया झोन टू च्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशला 28/ 16 असा पराभव करून दणदणीत विजय संपादन केला आहे . या यशाबद्दल भारतीय हँडबॉल (Handball) संघाच्या प्रशिक्षिका उषाताई ढमाळ पुणे यांच्या योग्य नियोजनाने भारतीय संघाने विजय संपादन केला आहे.

प्रशिक्षिका उषा ढमाळ यांच्या मार्गदर्शनाची चर्चा

हँडबॉल संघाच्या प्रशिक्षका उषाताई ढमाळ (Usha Dhamal Handball Coach) यांनी आपल्या संघाच्या कौतुकावर बोलताना स्पष्ट केले की संघातील खेळाडूंना आत्मविश्वास जागवणे ,संघ भावना दृढ करणे, सातत्याने डावपेच प्रोत्साहन देणे, विजयासाठी असलेली जिद्द व शिस्त निर्माण करणे हे एका प्रशिक्षकाचे खरे सामर्थ्य असते .

या विजयी झालेल्या खेळाडूंवर महाराष्ट्र राज्य हँडबॉल तसेच जिल्हास्तरावरील हँडबॉल खेळाडूंनी अभिनंदन केलेले आहे .व पुढील यशाबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे . तसेच पुढे ढमाळ यांनी म्हटले आहे की नवीन युवकांमध्ये हँडबॉल खेळासाठी नवीन पिढी घडावे यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर तालुकास्तरावर ही हँडबॉल चे सामने शासनाने, शाळा महाविद्यालय स्तरावर घेण्यात यावेत तरच पुढची पिढी निर्माण केली जाईल. त्यात हँडबॉल खेळाची आवड निर्माण होईल

हेही वाचा : Asian Para Games 2026 : भारताची पदकतालिकेत दमदार कामगिरी; ६४ पदकांसह पाचव्या स्थानावर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts