Gold Price Today : दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण सोन्याच्या बाजारात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे… काही दिवसांपूर्वी सोन्याचे दर गगनाला भिडले होते. सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणंही कठीण झालं होतं.. पण आता सोन्याच्या किमती घसरू लागल्या आहेत…आज सोन्याच्या दरात मोठी घसरण होताना पाहायला मिळाली….त्यामुळे आता सोनं खरेदी करण्याची ही सूवर्ण संधी आहे का? सोन्याचे दर अजून जास्त घसरणार आहे का? पाहूयात सविस्तर…..
सोन्याच्या दरात मोठी घसरण; ग्राहकांना दिलासा?
23 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या बाजारवृत्तांनुसार, मागील 10 व्यवहार सत्रांमध्ये सोन्याच्या वायदा दरात सुमारे 9 हजार 693 रुपयांची, म्हणजेच 6.4 टक्क्यांची घसरण झाली आहे…आज देखील सोन्याच्या दरात जवळपास 2 हजार रूपयांची घसरण झाली आहे (Gold Price Today)….10 ग्रॅम 24 कॅरेट (24 Carat Gold) सोन्याचे दर 1, 42, 480 रूपये पाहायला मिळाले…तर 22 कॅरेट सोन्याचे दर 1,30,600 रूपये पाहायला मिळाले…
आता सोन्याचे दर अचानक का घसरत आहेत? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल… याचं सर्वांत महत्त्वाचं कारण अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे… आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे महागाई पुन्हा वाढण्याची भीती निर्माण झाली आहे…कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ११४ डॉलरवर गेले आहे…. तेल महाग झालं की वाहतूक, उत्पादन आणि वस्तूंच्या किमती वाढण्याचा धोका असतो… अशा परिस्थितीत अमेरिकेची मध्यवर्ती बँक, म्हणजे फेडरल रिझर्व्ह, व्याजदर कमी करण्याचा निर्णय पुढे ढकलू शकते… आणि याच अपेक्षेमुळे सोन्याच्या किमतींवर दबाव निर्माण होत आहे.
हेही वाचा : SBI Data Leak : SBI बँकेचा डेटा लीक? ३,८९७ ग्राहकांची माहिती उघड; पैसे सुरक्षित आहेत का?
सोन्याचे दर घसरण्यामागची प्रमुख कारणे (Gold Price Today)
पण अमेरिकेचे व्याजदर आणि सोन्याचा काय संबंध? समजा एखाद्या गुंतवणूकदाराकडे एक लाख रुपये आहेत. त्याच्यासमोर सोनं खरेदी करणं किंवा व्याज देणाऱ्या सरकारी कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक करणं असे दोन पर्याय आहेत… सोनं खरेदी केल्यावर निश्चित व्याज मिळत नाही… मात्र कर्जरोख्यांमधून व्याज मिळू शकतं… त्यामुळे व्याजदर उच्च राहण्याची शक्यता वाढली, तर काही गुंतवणूकदार सोन्याऐवजी व्याज देणाऱ्या पर्यायांकडे वळू शकतात. परिणामी सोन्याची मागणी कमी होऊन दर घसरू शकतात….
सोन्याच्या किमतीवर परिणाम करणारा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे अमेरिकन डॉलर. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे व्यवहार प्रामुख्याने डॉलरमध्ये होतात. डॉलर मजबूत झाला, तर इतर देशांतील ग्राहकांसाठी सोनं तुलनेने महाग पडू शकतं. त्यामुळे मागणीवर दबाव येतो. भारत मोठ्या प्रमाणावर सोन्याची आयात करत असल्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाला, तर जागतिक बाजारात सोनं स्वस्त झालं तरी भारतात त्याचा संपूर्ण फायदा मिळेलच असं नाही. म्हणजेच भारतीय सोन्याच्या किमती डॉलर, रुपयाचा विनिमय दर, आयात शुल्क आणि स्थानिक मागणीवरही अवलंबून असतात.
आता या घसरणीचा सर्वसामान्य ग्राहकांना किती फायदा होणार? भारतात सोनं म्हणजे केवळ गुंतवणूक नाही, तर लग्नकार्य, सण आणि अडचणीच्या काळातील आर्थिक आधारही आहे. दिवाळीपूर्वी दर घसरल्यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो… मात्र सोन्याचा दर कमी झाला म्हणजे दागिन्याची अंतिम किंमत तेवढीच कमी होईल, असं नाही. उदाहरणार्थ, सोन्याची मूळ किंमत १ लाख ३० हजार रुपये असेल आणि त्यावर १५ टक्के मेकिंग चार्जेस लावले, तर १९ हजार ५०० रुपये अतिरिक्त खर्च येईल. त्यावर तीन टक्के जीएसटी धरल्यास एकूण बिल सुमारे १ लाख ५३ हजार ९८५ रुपये होईल. त्यामुळे सोनं खरेदी करताना केवळ बाजारभाव नव्हे, तर मेकिंग चार्जेस आणि अंतिम बिलही तपासणं आवश्यक आहे…
हेही वाचा : WhatsApp, Telegram बंद होणार? १ जानेवारी २०२७ पासून SIM कार्डबाबत नवा नियम!
सोन्याच्या दरातील घसरणीचा ग्राहकांना किती फायदा? (Gold Price Diwali 2026)
पण ज्यांनी आधीच महागड्या दरात सोनं खरेदी केलं, त्यांचं काय? समजा एखाद्या व्यक्तीने दहा ग्रॅम सोनं दीड लाख रुपयांना खरेदी केलं आणि त्याचा बाजारभाव १ लाख ४२ हजार रुपयांवर आला, तर सोन्याच्या बाजारमूल्यात आठ हजार रुपयांची घट झाली. मात्र सोनं विकलं नसेल, तर हे प्रत्यक्ष नुकसान नाही…पण जर त्यांनी ते विकण्याचा निर्णय घेतला तर नुकसान होऊ शकतो…तसंच दागिने विकताना मेकिंग चार्जेस आणि जीएसटी परत मिळत नसल्यामुळे नुकसान अधिक होऊ शकतं.
आता सर्वांत महत्त्वाचा प्रश्न, सोनं आणखी स्वस्त होणार का? याचं निश्चित उत्तर देता येणार नाही. अमेरिकेतील व्याजदर, डॉलरची दिशा, कच्च्या तेलाच्या किमती, जागतिक तणाव आणि भारत-चीनमधील सोन्याची मागणी यावर पुढील दर अवलंबून असतील. व्याजदर उच्च राहण्याचे संकेत मिळाले, तर सोन्यावर दबाव कायम राहू शकतो. मात्र जागतिक अनिश्चितता वाढल्यास सोन्याला पुन्हा मागणीचा आधार मिळू शकतो….त्यामुळे सोनं खरेदी करायचं की थांबायचं, हे आपल्या गरजेनुसार ठरवावं. लग्नासाठी लवकर सोनं आवश्यक असेल, तर दर आणखी घसरण्याची वाट पाहणं जोखमीचं ठरू शकतं. गुंतवणुकीसाठी मात्र टप्प्याटप्प्याने खरेदी करण्याचा निर्णय योग्य राहील…









